CCTV | उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याची बियर शॉपीत दबंगगिरी, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण
बियर शॉपीत दोन व्यक्ती बसलेल्या आहे. एक व्यक्ती मोबाईलवरती बोलत आहे.त्याचवेळेस दोन व्यक्ती बियर शॉपीच्या गेटमधून प्रवेश करीत आहेत. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने तिथं असलेली एक वस्तू हातात घेतली आहे.

औरंगाबाद – बियर शॉपीतील (Beer Shop) ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department)अधिकाऱ्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार औरंगाबादमधील मुकुंदवाडीत (Aurangabad Mukundwadi) घडला असून व्हिडीओत अधिकारी बियर शॉपीतल्या एका वस्तूने बेदम मारहाण करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव भारत दोंड असं आहे. बियर शॉपीत घुसून गावगुंडासारखी मारहाण केल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाचं व्हायरल झाला आहे. ही घटना दोन दिवसापुर्वी घडली असून अद्याप उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यावरती कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्याने मारहाण केल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
व्हिडीओत काय आहे
बियर शॉपीत दोन व्यक्ती बसलेल्या आहे. एक व्यक्ती मोबाईलवरती बोलत आहे.त्याचवेळेस दोन व्यक्ती बियर शॉपीच्या गेटमधून प्रवेश करीत आहेत. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने तिथं असलेली एक वस्तू हातात घेतली आहे. त्या वस्तूने आतमध्ये असलेल्या दोन व्यक्तीना तो मारहाण करीत आहे. त्यावेळी मारहाण करीत असताना अधिकाऱ्याच्या हातातली वस्तू मोडली आहे. तिथं बिअर शॉपीत असलेल्या अनेक व्यक्तींना अधिकाऱ्याने मारहाण केली आहे. सगळ्या ग्राहकांना अधिकाऱ्याने तिथून हाकलून देत मारहाण केली आहे. एका ग्राहकाने का मारहाण करीत असल्याच विचारल्यानंतर त्याला गेटवर जाईपर्यंत मारहाण केली आहे.




मारहाणीचं कारण अस्पष्ट
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने त्यावेळी असलेल्या सगळ्या ग्राहकांना का मारहाण केली, हे अद्याप अस्पष्ट आहे. तसेच गाव गुंडासारखी मारहाण केल्याने परिसरात जोरात चर्चा आहे. मारहाणीचा व्हिडीओ अनेकांच्या मोबाईलवरती फिरत आहे. हा सगळा प्रकार औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरातील बियर शॉपित घडला आहे. या घटनेला दोन दिवस उलटले असून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.