अंबरनाथच्या ज्वेलर्स व्यापाऱ्याला लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकी, पैसे दिले नाही तर…

अंबरनाथमध्ये एका ज्वेलर्सला एक धमकीचा कॉल आला. या फोननंतर एकच खळबळ उडाली. ज्वेलर्स मालकाने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

अंबरनाथच्या ज्वेलर्स व्यापाऱ्याला लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकी, पैसे दिले नाही तर...
अंबरनाथमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या नावे धमकीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 2:22 PM

अंबरनाथ / निनाद करमरकर : अंबरनाथमधील एका ज्वेलर्स व्यापाऱ्याला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने चक्क 20 हजारांच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा फ्रॉड कॉल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धमकीचा फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली. 20 हजार रुपये न दिल्यास मुलीचे अपहरण करण्याचीही धमकी दिली. सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी असलेला लॉरेन्स बिष्णोई हा सध्या जेलमध्ये असून त्याने सलमान खानला सुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मात्र त्याच्या नावाचा वापर करून दहशत माजवण्याचा हा प्रयत्न असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुलीचे अपहरण केल्यास 20 लाख द्यावे लागतील

अंबरनाथच्या महालक्ष्मी नगर परिसरात परबतसिंग चुडावत यांचं देव भैरव ज्वेलर्स नावाचं सोन्या-चांदीचं दुकान आहे. चुडावत यांना 23 मार्च रोजी एक व्हॉट्सऍप कॉल आला. यावेळी समोरच्या व्यक्तीने आपण लॉरेन्स बिष्णोई गॅंगकडून बोलत असल्याचं सांगत 20 हजार रुपये खंडणी मागितली. तसंच 20 हजार रुपये न दिल्यास मुलीचं अपहरण करू, त्यानंतर 20 लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी त्याने दिली. 20 हजार रुपये पाठवण्यासाठी धमकी देणाऱ्याने चक्क क्यूआर कोड पाठवला.

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

या प्रकाराने गोंधळात पडलेल्या परबतसिंग चुडावत यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी क्यूआर कोडवरून समोरील व्यक्तीचा नंबर मिळवला असता तो दिल्लीचा असल्याचं निष्पन्न झालं. याबाबत सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने अधिक तपास केला असता, हा फ्रॉड कॉल असल्याचं समोर आलं. यानंतर आता हा कॉल करणाऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.