Fact Check | मॉलबाहेर पोलिसाचा दाम्पत्यावर गोळीबार, व्हायरल व्हिडीओमागील सत्य काय?

पोलिसाने एका रेस्टॉरंटबाहेर दाम्पत्यावर केलेल्या गोळीबाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहे (Fact Check Video Couple Shot )

Fact Check | मॉलबाहेर पोलिसाचा दाम्पत्यावर गोळीबार, व्हायरल व्हिडीओमागील सत्य काय?
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 12:05 PM

नवी दिल्ली : मॉलबाहेर पोलिसाने तरुण दाम्पत्यावर गोळी झाडल्याचा एक व्हिडीओ सोशल माडियावर व्हायरल झाला आहे. भरदिवसा ऐन गर्दीत घडलेल्या या प्रकारामुळे नेटिझन्स चक्रावले आहेत. मात्र संबंधित व्हिडीओ एका वेब सीरिजमधील सीन असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील दहशतवादविरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली. (Fact Check on Trending Viral Video of Couple Being Shot by Police Outside a Mall)

काय आहे व्हिडीओमध्ये?

हरियाणीतल कर्नालमध्ये एका मॉलबाहेर या वेब सीरीजचे शूटिंग करण्यात आले. फ्रेण्ड्स कॅफेबाहेरील रस्त्यावर पोलिस अधिकारी आणि एका तरुणाची बाचाबाची होते. क्षणार्धात अधिकारी तरुणाला खाली ढकलतो आणि खिशातून बंदूक काढून त्याच्यावर गोळी झाडतो. त्यानंतर त्याला जाब विचारणाऱ्या सोबतच्या तरुणीचीही तो गोळी झाडून हत्या करतो, असं संबंधित वेब सीरिजमधील कथानक आहे. कोणीतरी चहाटळपणे त्यातील तितकाच व्हिडीओ कट करुन सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे नेटिझन्समध्ये घबराट पसरली.

पोलिस अधीक्षकांकडून खुलासा

“#FactCheck- पोलिसाने एका रेस्टॉरंटबाहेर केलेल्या हत्येचा व्हिडीओ सकाळपासून सोशल मीडियावर पसरला आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण होऊन गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. याबद्दल तपास केला असता हरियाणीतल कर्नालमधील हा व्हिडीओ असल्याचं समजलं. फ्रेण्ड्स कॅफेच्या मॅनेजरच्या माहितीनुसार हा एका वेब सीरिजसाठी केलेल्या चित्रिकरणाचा भाग असल्याचं स्पष्ट झालं.” असं ट्विट उत्तर प्रदेशमधील दहशतवादविरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल श्रीवास्तव यांनी व्हिडीओ शेअर करत केलं आहे.

पाहा व्हिडीओ

पोलिसांच्या प्रतीमा मलीन करणाऱ्या वेब सीरीज बॅन कराव्यात, अशी मागणी काही जणांनी राहुल श्रीवास्तव यांच्या ट्वीटवर केली आहे.

संबंधित बातम्या :

प्रसिद्ध पार्श्वगायिकेच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, ‘गायिका’ मावशी-‘संगीतकार’ काका अटकेत

VIDEO | सोनसाखळी चोरीसाठी हल्ला, आठ महिन्यांच्या गर्भवतीला फरफटत नेले…

(Fact Check on Trending Viral Video of Couple Being Shot by Police Outside a Mall)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.