मालकाचे पैसे खात्यात जमा करायला चालला होता दिवाणजी, अज्ञात इसमांचा सीआयडी असल्याचे सांगत पैसे घेऊन पोबारा

नेहमीप्रमाणे अग्रवाल यांनी त्यांचे दिवाणजी बसंत बकाराम सोनावणे यांच्याकडे 2 लाख 1 हजार रुपये बँकेत जमा करण्यासाठी दिले. ते पैसे जमा करण्यासाठी बँकेत पायी जात असताना त्यांना दोन अज्ञात व्यक्तींनी गांधी प्रतिमा चौकात थांबवले.

मालकाचे पैसे खात्यात जमा करायला चालला होता दिवाणजी, अज्ञात इसमांचा सीआयडी असल्याचे सांगत पैसे घेऊन पोबारा
जेष्ठ नागरिकांना लुटणारा चोरटा जेरबंदImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 7:36 PM

गोंदिया : मालकाच्या ट्रेडर्सचे पैसे खात्यात जमा करण्यासाठी जाणाऱ्या दिवाणजीला तोतया सीआयडी पोलिसांनी लुटल्याची घटना गोंदिया शहरातील गांधी प्रतिमा चौकात घडली आहे. दिवाणजी बँकेत जात असतानाच वाटेत दोन अज्ञात इसमांनी आपण सीआयडी पोलीस आहोत, असे सांगून त्यांच्याकडील पिशवीतून 1 लाख 35 हजार रुपये लुटून पोबारा केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

गुरुनानक वॉर्डात आहे हेमंत अग्रवाल यांचे मोबाईलचे दुकान

गोंदिया येथील गुरूनानक वॉर्डात राहणारे हेमंत अग्रवाल यांचे मोबाईलचे दुकान आहे. दुकानाचे पैसे शहरातील देशबंधू वॉर्डातील जनता सहकारी बँकेतील खात्यात ते जमा करतात.

नेहमीप्रमाणे अग्रवाल यांनी दिवाणजीकडे बँकेत पैसे भरायला दिले

नेहमीप्रमाणे अग्रवाल यांनी त्यांचे दिवाणजी बसंत बकाराम सोनावणे यांच्याकडे 2 लाख 1 हजार रुपये बँकेत जमा करण्यासाठी दिले. ते पैसे जमा करण्यासाठी बँकेत पायी जात असताना त्यांना दोन अज्ञात व्यक्तींनी गांधी प्रतिमा चौकात थांबवले.

हे सुद्धा वाचा

अज्ञात इसमांनी सीआयडी पोलीस असल्याची बतावणी करत पैसे लुटले

या इसमांनी त्यांना आम्ही सीआयडी पोलीस आहोत. तुमच्याकडे गांजा आहे याची तपासणी करू द्या, असे सांगितले. दरम्यान, त्या चोरट्यांनी संधी साधून त्यांच्याकडील पिशवीतील 2 लाख 1 हजार रुपयांपैकी परंतु 1 लाख 35 रुपये पळवून नेले.

मात्र 500 रुपयांच्या नोटा असलेला बंडल वेगळाच होता आणि 66 हजार रुपयांच्या गड्या वेगळ्या होत्या, त्यामुळे हे पैसे वाचले. आरोपींनी तपासणीच्या नावावर त्यांची दिशाभूल करीत 1 लाख 35 हजार रुपये असलेला बंडल चोरून नेला.

या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोंदिया शहर पोलिसांनी दोघा तोतया सीआयडी पोलिसांवर गुन्हा दाखल केला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.