AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बनावट रेमडेसिव्हीरमुळे रुग्णाचा मृत्यू, बारामतीत चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

बारामती तालुका पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर औषध बनवून विकणाऱ्या चौघांना अटक केली होती (Fake Remdesivir Injection kills patient)

बनावट रेमडेसिव्हीरमुळे रुग्णाचा मृत्यू, बारामतीत चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
remdesivir
| Updated on: Apr 23, 2021 | 3:51 PM
Share

बारामती : बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बारामतीत समोर आली आहे. या प्रकरणी चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधीच रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या काळाबाजारामुळे राज्यात खळबळ उडाली असताना बनावट औषध रुग्णांच्या जीवावर उठत असल्याचं समोर आलं आहे. (Fake Remdesivir Injection kills corona patient in Baramati)

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर औषध बनवून विकणाऱ्या चौघांना अटक केली होती. या चौघांवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरु केला होता. त्यानंतर या बनावट औषधामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्यामुळे आता पोलिसांनी या प्रकरणातील चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

बारामतीत चौघांना सापळा रचून अटक

बारामतीत दिलीप गायकवाड, संदीप गायकवाड, प्रशांत घरत आणि शंकर भिसे या चौघांनी बनावट रेमडिसीव्हर इंजेक्शन बनवून त्याची विक्री केली होती. बारामती तालुका पोलिसांनी सापळा रचत या चौघांना अटक केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करताना एकाचा या बनावट औषधामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. या चौघांवर पोलिसांनी कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.

चेंबुरमधील महिलेची फसवणूक

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांसाठी आवश्यक असणारे रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तसेच दुसरीकडे या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु आहे. मुंबईतील चेंबूर भागातील एका महिलेने ऑनलाईन रेमडेसिव्हीर मागवले असता तिला दुसरेच इंजेक्शन देण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

एका ऑनलाईन वेबसाईटवर रेमडेसिव्हीर उपलब्ध असल्याची माहिती तिला मिळाली. त्यानंतर तिने त्या इंजेक्शनची ऑर्डर दिल्यानंतर 18 हजार रुपये दिले. मात्र तिला दुसरेच इंजेक्शन देण्यात आल्याची घटना समोर आली. यानंतर त्या महिलेने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच पोलिसांनी याबाबतचा वेगाने तपास करून 24 तासात आरोपी रुपेश गुप्ता याला पालघरच्या वाळीव येथून अटक केली. या आरोपीने याआधी दादर, घाटकोपर, अंधेरी, बोरिवली या ठिकाणी 7 जणांना तब्बल 29 इंजेक्शन विकल्याची माहिती समोर आली आहे.

नागपुरात दोन नर्सच्या पतींना अटक

तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यात नकली रेमडेसिव्हीरचा काळाबाजार प्रकरणी कारवाई सुरु आहे. या प्रकरणी एका रुग्णालयातील दोन नर्सच्या पतींना अटक करण्यात आली आहे. नागपुरात गेल्या 15 दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. या रॅकेटमधील तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

संंबंधित बातम्या : 

Video: नंदुरबारच्या खासदार म्हणतात, जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिव्हीरचा साठा बाहेर विकला !

रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार तेजीत, मुंबईसह नागपूर पोलिसांची कडक कारवाई

(Fake Remdesivir Injection kills corona patient in Baramati)

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.