1 घर, 5 मृतदेह…वसंत कुंजमध्ये बुराडी सारखं कांड, दरवाजा तोडून आत प्रवेश करताच थरकाप

घराच्या आत नेमकं काय घडलं?. दिल्लीतल्या बुराडी कांडची आठवण झाली. 1 जुलै 2018 मध्ये बुराडीमध्ये झालेल्या घटनेने सगळ्या देशाला हादरवून सोडलं होतं. समोरच दृश्य पाहून पोलीसही हैराण.

1 घर, 5 मृतदेह...वसंत कुंजमध्ये बुराडी सारखं कांड, दरवाजा तोडून आत प्रवेश करताच थरकाप
delhi vasant kunj
Follow us
| Updated on: Sep 28, 2024 | 9:22 AM

दिल्लीमध्ये बुराडी सारखं कांड घडलं आहे. एकाच घरात पाच मृतदेह सापडले. दिल्लीच्या रंगपुरी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी चार मुलींसह स्वत:ला संपवून घेतलं. 50 वर्षीय हीरा लालच कुटुंब रंगपुरी भागात भाड्याच्या घरात राहत होतं. त्याला चार मुली होत्या. चारही मुली दिव्यांग होत्या. दिव्यांग असल्यामुळे त्या चालू-फिरु शकत नव्हत्या. हीरा लालच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मुलींच्या देखभालीची जबाबदारी त्याच्यावर होती. आसपासच्या घरात राहणाऱ्या लोकांनी हीरा लालच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला, त्यावेळी समोरच दृश्य पाहून पोलीसही हैराण झाले.

घटना शुक्रवारची, दिल्लीच्या रंगपुरी गावातील आहे. हिरालालने विषारी पदार्थ खाऊन आपल्या चार मुलींसह आत्महत्या केली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून चारही मृतदेह बाहेर काढले. चारही मुली विकलांग असल्याने चालण्या-फिरण्यामध्ये असमर्थ होत्या. वसंत कुंज पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. डीसीपी रोहित मीना यांनी ही माहिती दिली. 50 वर्षांचा हीरा लाल कुटुंबासह रंगपुरी गावात भाड्याच्या घरात राहत होता. पत्नीचा मृत्यू आधीच झाला होता. कुटुंबात 18 वर्षांची मुलगी नीतू, 15 वर्षांची निशी, 10 वर्षांची नीरु आणि आठ वर्षांची मुलगी निधी होती.

पोलिसांनी दरवाजा तोडला त्यावेळी आत काय दिसलं?

वसंत कुंज येथील स्पायनल इंजरी हास्पिटलमध्ये नोकरीला होता. हीरालालवर मुलांच्या देखभालीची जबाबदारी होती. शुक्रवारी हीरालालच्या फ्लॅटमधून दुर्गंधी यायला सुरुवात झाली. आसपासच्या लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, त्यावेळी बेडवर हीरालालचा मृतदेह पडलेला होता. दुसऱ्या खोलीत चारही मुलींचे मृतदेह होते.

बुराडीमध्ये काय घडलेलं?

FSL च्या टीमला घटनास्थळी पुरावे गोळा करण्यासाठी बोलावलं. हीरालालच्या कुटुंबात सर्वांनी सल्फास खाऊन संपवून घेतलं. पोलिसांना या बाबत पुरावे मिळाले आहेत. पोलिसांना अजूनपर्यंत सुसाईड नोट मिळालेली नाही. एकाच घरात पाच मृतदेह मिळाल्याने बुराडी सुसाइड केसची आठवण झाली. 1 जुलै 2018 बुराडीमध्ये झालेल्या घटनेने सगळ्या देशाला हादरवून सोडलं होतं. एकाच कुटुंबातील 11 सदस्यांनी आत्महत्या केली होती.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.