दोन्ही सुनांचं भांडण सुरु होतं, सासरा मध्ये सोडवायला, पण पुढे जे घडलं ते भयंकर

सुनांचं भांडण सुरु होतं. सासरा सोडवायला गेला. पण सुनांनी सासऱ्याचं ऐकायच्या ऐवजी भलंतच कृत्य केलं. मग सासरा संतपला अन् घडू नये ते घडलं.

दोन्ही सुनांचं भांडण सुरु होतं, सासरा मध्ये सोडवायला, पण पुढे जे घडलं ते भयंकर
कौटुंबिक वादातून सासऱ्याने सुनेला संपवले
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 10:03 AM

आग्रा : उत्तर प्रदेशात एक भयंकर घटना समोर आली आहे. सुनांचं भांडण सोडवायला गेलेला सासरा भलतंच करुन बसला. यानंतर सासऱ्याची थेट तुरुंगात रवानगी झाली. सुनांचं भांडण सोडवत असताना लहान सुनेने सासऱ्याला लाथ मारली. यानंतर संतापलेल्या सासऱ्याने कुऱ्हाडीने वार करुन लहान सुनेची हत्या केली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे. प्रियंका सिंह असे मयत सुनेचे तर रघुवीर सिंह असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे. सुनेची हत्या केल्यानंतर सासऱ्याने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.

आग्रा येथील मलिकपूर गावात ही धक्कादायक घटना घडली. रघुवीर सिंह यांना दोन मुलगे असून, ते पोलीस कॉन्स्टेबल आहेत. दोन्ही मुलांचा विवाह मथुरा येथील दोघी सख्या बहिणींसोबत झाला होता. मात्र 4 वर्षापूर्वी मोठ्या सुनेचा मृत्यू झाला. यानंतर मोठ्या मुलाने दुसरा विवाह केला. मात्र दीड वर्षापूर्वी मोठ्या मुलाचाही मृत्यू झाला.

काय घडलं नेमकं?

मोठी सून धर्मवती आणि छोटी सून प्रियंका यांचे जोरदार भांडण सुरु होते. रघुवीर मध्ये सोडवायला गेला. मात्र भांडण सोडवायला आलेल्या सासऱ्याला छोटी सून प्रियंकाने लाथ मारली. यामुळे सासऱ्याचा संताप झाला होता. अखेर सकाळ होताच सासऱ्याने कुऱ्हाडीने प्रियंकावर वार केले आणि तिची हत्या केली. यानंतर थेट पोलीस ठाणे गाठले आणि सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी हत्येत वापरलेली कुऱ्हाडही जप्त केली आहे. पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सरवणकरांच्या धनुष्यबाणाला अमित ठाकरेंचा आधार, आमने-सामने आलेत अन्...
सरवणकरांच्या धनुष्यबाणाला अमित ठाकरेंचा आधार, आमने-सामने आलेत अन्....
उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्वेत कुटुंबासह केलं मतदान, नागरिकांना आवाहन
उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्वेत कुटुंबासह केलं मतदान, नागरिकांना आवाहन.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसह बजावलं मतदानाचं कर्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसह बजावलं मतदानाचं कर्तव्य.
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क.
कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडल
कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडल.
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात.
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क.
शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार, नेमकं काय झालं?
शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार, नेमकं काय झालं?.
विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? कोणत्या नेत्यान दिली टीप?
विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? कोणत्या नेत्यान दिली टीप?.
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.