लग्नासाठी नकार दिल्याने बापाकडून मुलीची हत्या, मृतदेह अर्धवट जळल्याने पुन्हा दफन, आठ दिवसांनंतर घटनेचा उलगडा

मुलगी विवाहास तयार होत नसल्याच्या कारणावरुन चिडलेल्या बापाने मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. (father killed daughter in Sangli)

लग्नासाठी नकार दिल्याने बापाकडून मुलीची हत्या, मृतदेह अर्धवट जळल्याने पुन्हा दफन, आठ दिवसांनंतर घटनेचा उलगडा
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 2:41 PM

सांगली : मुलगी विवाहास तयार होत नसल्याच्या कारणावरुन चिडलेल्या बापाने मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे या घटनेनंतर मुलीच्या बापाने गुपचूप तिचा अंत्यविधीही उरकला. मात्र प्रेत अर्धवट जळाल्यामुळे ते पुन्हा दफन करण्यात आले. हा सर्व धक्कादायक प्रकार सांगलीतील आटपाडी या ठिकाणी घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. (father killed daughter in Sangli)

नेमकं काय घडलं?

सांगलीच्या आटपाडी येथे बनपुरी येथे पूर्वेला चौगुले वस्तीवर उत्तम चौगुले नावाचे गृहस्थ राहत होते. उत्तम चौगुले यांच्या मुलीच्या लग्नासाठी एक स्थळ आलं होते. पण या लग्नाला मुलीचा नकार होता. ती आता लग्न नको, असे वारंवार घरात सांगत होती. यावरुन शनिवारी 13 मार्चला वडील आणि मुलीमध्ये टोकाचा वाद झाला.

या वादातून तिच्या वडिलांनी त्या मुलीला बेडग्याने बेदम मारहाण केली. यावेळी डोक्‍यावर घाव बसल्यामुळे मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तिच्या वडिलांनी घरात स्वच्छता केली.

हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाल्याचा बनाव

त्यानंतर शेजाऱ्यांसमोर मुलीचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाल्याचा बनाव केला. यावेळी वस्तीवरची अनेक माणसे या ठिकाणी अंत्यविधीसाठी जमा झाली. त्यावेळी अनेकांना ही घटना संशयास्पद वाटली. त्यामुळे त्यांनी काढता पाय घेतला. विशेष म्हणजे त्या मुलीला पाहण्यासाठी येणाऱ्या मुलाच्या कुटुंबियांनाही त्यांनी याची माहिती दिली नाही.

गुपचूप अंत्यसंस्कारही उरकले

यानंतर आरोपी उत्तम चौगुले याने इतर चौघांना सोबत घेऊन घराशेजारीच असलेल्या ओढापात्राजवळ मध्यरात्री तिचा अंत्यविधी उरकला. मात्र तिचे प्रेत अर्धवट जळल्यामुळे त्याने ते ओढा पात्रातच दफन केले.

मात्र या घटनेनंतर गावात उलटसुलट चर्चा सुरु होती. आठ दिवसांनंतर हा सर्व प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी संशयित आरोपी उत्तम चौगुले याला ताब्यात घेण्यात आले. यानंतर पोलिसांनी पोलिसी हिसका दाखवताचा त्याने स्वत:च्या मुलीचा खून केल्याची कबूली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (father killed daughter in Sangli)

संबंधित बातम्या  :

सातपुडा वनक्षेत्रात अवैध धंदा करणाऱ्या अड्ड्यावर धाड, 51 जणांच्या मुसक्या आवळल्या

संतापजनक ! लग्नाआधी महिलेचं सात वर्ष लैंगिक शोषण, लग्नानंतरही ब्लॅकमेल करत चार वर्ष छळलं, विरोध करताच आक्षेपार्ह फोटो व्हायरल

बदलापुरात तरुणाची तीन पाळीव कुत्र्यांसह आत्महत्या, कारण वाचून तुम्हीही हादराल!

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.