AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नॉनव्हेज खाण्यावरून भांडणं, लग्नासाठीही दबाव, 12 दिवस ब्लॉक केल्यानंतर अखेर तिने….

मुंबईतील पवई भागात एअर इंडियाच्या एक महिला पायलटने गळफास घेत आयुष्य संपवलं. तिचा बॉयफ्रेंड मानसिक रित्या तिला त्रास देत होता, असा आरोप लावण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर त्याने 12 दिवस तिला व्हॉट्सॲपवर ब्लॉकही केलं होतं. त्याच्या छळाला कंटाळून अखेर तिने टोकाचं पाऊल उचललं.

नॉनव्हेज खाण्यावरून भांडणं, लग्नासाठीही दबाव, 12 दिवस ब्लॉक केल्यानंतर अखेर तिने....
एअर इंडियाच्या पायलटने उचललं टोकाचं पाऊल
| Updated on: Nov 28, 2024 | 9:04 AM
Share

मुंबईतील पवईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथे आदित्य पंडित नावाच्या तरूणाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तो त्याच्या गर्लफ्रेंडला मानसिक त्रास द्यायचा असा आरोप त्याच्यावर आहे. सृष्टी तुली असं त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव असून ती एअर इंडियामध्ये पायलट होती. सृष्टीने आपल्या पद्धतीने आयुष्य जगावं, कसं वागावं, काय खावं, काय प्यावं, या सगळ्याच गोष्टींसाठी आदित्य तिच्यावर दबाव टाकायचा असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. दोन वर्षं त्यांचं रिलेशन होतं. मात्र आदितयचा त्रास वाढतच होता. यावेळेस त्याने तिला तब्बल 12 दिवस व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्यानंतर अखेर 13 व्या दिवशी सृष्टीने त्याला फोन केला आणि आपण आयुष्य संपवत असल्याचं सांगितलं. त्रासाला कंटाळून तिने गळफास लावून घेत आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य पंडीत आणि सृष्टी दोघे रिलेशनमध्ये होते. आदित्य सतत सृष्टीला टॉर्चर करायचा. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्यांच्यात वाद व्हायचे. एकदा तर हद्दच झाली. शॉपिंगला जाण्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यातच त्याच्या कारचा अपघात झाला. मात्र त्यावेळी आदित्य तिला भररस्त्यात सोडून निघून गेला. आपल्या मैत्रिणीच्या मदतीने सृष्टी कशीबशी घरी पोहोचली. आदित्यच्या या वागण्यामुळे सृष्टी खूप दुखावली गेली, पण प्रेमात असल्याने तिने याकडे कानाडोळा केला.

नॉनव्हेज खाण्यावरूनही भांडण

एकदा त्यांच्यात नॉनव्हेजवरूनही वाद झाला कारण आदित्य पंडितला नॉनव्हेज आवडत नव्हतं. आदित्यने रेस्टॉरंटमध्ये सर्वांसमोरच सृष्टीचा अपमान केला, पण तरीही सृष्टीने त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. एक ना एक दिवस आदित्य नॉर्मल वागेल, अशी तिला खात्री होती. पण काही दिवसांपूर्वीच आदित्यच्या बहिणीचे लग्न ठरले तेव्हा त्या लग्नाला जाण्यासाठी आदित्यने सृष्टीवर इतका दबाव टाकला की त्यांच्यात पुन्हा वाद झाला.

12 दिवस व्हॉट्सॲपवर ब्लॉक

एवढंच नव्हे तर आदित्यने सृष्टीला 12 दिवसांसाठी व्हॉट्सॲपवर ब्लॉक केलं. यामुळे सृष्टी खूप नाराज झाली. अखेर 25 नोव्हेंबरच्या रात्री तिने आदित्यला फोन केला आणि आपण आपलं आयुष्य संपवत असल्याचं त्याला सांगितलं. तिचं बोलणं ऐकून आदित्य खूप गाबरला, धावतपळत तो तिच्या फ्लॅटवर पोहोचला. पण दरवाजा आतून बंद होता. त्याने कसाबसा चावीवाला बोलावत दार उघडून घेतलं आणि समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आतमध्ये गेल्यावर त्याला सृ्ष्टीचा मृतदेह पंख्यावला लटकलेला आढळला. आत्महत्येसाठी तिने डेटा केबलचा वापर केला.

पोलिसांनी केली अटक

तरूण मुलगी गेल्यामुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. सृष्टीच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिचा प्रियकर आदित्य पंडित याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. मृत सृष्टी तुली यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याचे पवई पोलिसांनी सांगितले. सृष्टीचा मृतदेह पोलिसांन ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.