शेतीच्या वादावरून कुटुंबावर सशत्र हल्ला, तीन जण गंभीर जखमी, बुलडाण्यातील धक्कादायक प्रकार

शेताच्या सीमेचा वाद विकोपाला गेल्यामुळे दोन कुटुंबामध्ये सशस्त्र मारामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत खरात कुटुंबीयाने सोळंके परिवारावर प्राणघात हल्ला केला आहे. या हल्ल्यात तीन जण गंभीररीत्या जखमी आहेत.

शेतीच्या वादावरून कुटुंबावर सशत्र हल्ला, तीन जण गंभीर जखमी, बुलडाण्यातील धक्कादायक प्रकार
buldhana farmer
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 11:08 PM

बुलडाणा: शेताच्या सीमेचा वाद विकोपाला गेल्यामुळे दोन कुटुंबामध्ये सशस्त्र मारामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत खरात कुटुंबीयाने सोळंके परिवारावर प्राणघात हल्ला केला आहे. या हल्ल्यात तीन जण गंभीररीत्या जखमी आहेत. ही घटना सिंदखेड राजा तालुक्यातील डावरगाव येथील असून या प्रकरणी सिंदखेड राजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींवर सध्या औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (fight between two farmers family three seriously injured in Buldhana Sindkhed Raja)

सोळंके परिवारातील तीन जण गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार सिंदखेडराजा तालुक्यातील डावरगाव येथील खरात आणि सोळंके परिवाराचे गेल्या 10 वर्षांपासून शेतातील रस्त्यासाठी भांडण सुरु आहे. मात्र सोळंके कुटुंबाने हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर भांडण मिटवण्याचा प्रयत्न करताना खरात परिवाराने सोळंके परिवारावर सशस्त्र हल्ला केला आणि मारहाण केली. यामध्ये सोळंके परिवारातील 3 जण जखमी झाले आहेत. हे तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

आरोपींना अटक करण्याची मागणी

या प्रकरणी खरात परिवारातील एकूण सात जणांविरोधात सिंदखेडराजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपींना अद्याप अटक केलेले नाही. त्यामुळे या हल्ल्यात जखमी झालेले प्रकाश सोळंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांना निवेदन दिले आहे. तसेच या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करुन कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या :

लग्नानंतर दोनच दिवसात नवविवाहितेवर गँगरेप, पतीसह दोन दीरांकडून अत्याचार

चोराच्या उलट्या बोंबा, मध्यरात्री चोरटा सोसायटीत घुसला, चोरी करताना रंगेहाथ पकडलं, पण…….

नऊ दिवसांपूर्वीच लग्न, माहेरी येऊन विवाहितेची प्रियकरासोबत आत्महत्या

(fight between two farmers family three seriously injured in Buldhana Sindkhed Raja)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.