AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

son in law love story : ‘साली आधी घरवाली’ म्हणत तिला पूर्णच आपली करण्यासाठी मेहुण्याचा पराक्रम; नेली पळवून

सासरच्यांनी कापूसवाडगाव येथील जावयाचे घर गाठून व्याह्यांना सर्व माहिती दिली. मात्र त्यानंतर ही मुलगी घरी परतली नसल्याने मुलीच्या वडिलांनी वैजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीवरून पोलिसांनी जावई, त्याचे वडील, मित्र अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

son in law love story : 'साली आधी घरवाली' म्हणत तिला पूर्णच आपली करण्यासाठी मेहुण्याचा पराक्रम; नेली पळवून
संग्रहीत फोटोImage Credit source: tv9
| Updated on: May 21, 2022 | 4:53 PM
Share

Aurangabad Crime: आपल्याकडे कधी कोण काय करेल याचा काही नियम नाही. आधी फक्त म्हणीतच तर चेस्टेने साली आधी घरवाली म्हटले जात होते. मात्र याच म्हणीचा आज अर्थ पुर्ण करण्याचा प्रयत्न औरंगाबादच्या (Aurangabad) एका मेहुण्याने केला आहे. त्याच्या पराक्रमामुळे औरंगाबाद पंचक्रोशीत एकच चर्चा रंगली असून दोन्ही कुटुंबांना मात्र मान खाली घालण्याची वेळ आली आहे. तर या जावयाच्या (son in law) पराक्रमामुळे सासरचे हैराण झाले आहेत. ही घटना औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील घोंदलगाव येथील आहे. आधी मोठ्या बहिनीशी लग्न केल्यानंतर या भाद्दराने आपल्या अल्पवयीन मेहुनीलाच (वय-17) (Minor sister in law) गळ घालून पळवून नेली. त्यामुळे आपल्या दोन्ही मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आता सासरच्यांनी थेट पोलिसांत धाव घेतली आहे. तर जावयासह त्याच्या साथीदाराविरुध्द वैजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंद केली आहे.

कुटुंबातील मुलीचे लग्न दीड वर्षांपूर्वीच

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील धोंदलगाव येथील एका कुटुंबातील मुलीचे लग्न दीड वर्षापूर्वी तालुक्यातीलच कापूसवाडगाव येथील एका तरूणाशी झाले होते. लग्नानंतर जावयाचे घरी येणे- जणे सुरू होते. तर जावयात आणि मेहुणीत बोलणे होतच होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे कधीच कोणी संशय घेतला नाही. मात्र जावयाने आपला पराक्रम दाखवला आणि अल्पवयीन मेहुणीलाच आपल्या सोबत पळवून नेली. त्याने हा पराक्रम 9 मे ला केला. जावाई हा त्यादिवशी धोंदलगाव येथे सासरवाडीला मुक्कामी आला. आणि रात्रीच्या सुमारास सर्व कुटुंबासह जेवण आटोपून सगळे झोपी गेले. मात्र सकाळी कुटुंब जागे झाल्यानंतर जावयासह त्यांची अल्पवयीन मुलगी घरातून गायब झाल्याचे दिसून आले. त्यानंतर घरच्यांनी गावातील नातलगांच्या घराकडे शोध घेतला मात्र आजूबाजूला दोघांचाही शोध लागला नाही. त्यामुळे सासरच्या मंडळींना धक्काच बसला आहे.

आपणच अल्पवयीन मेहुणीला पळवले

दरम्यान दोघांचा शोध सुरू असतानाच स्वत: जावायाने रात्र 12 वाजता सासरच्यांना फोन करत आपणच अल्पवयीन मेहुणीला आपल्या बरोबर नेल्याचे सांगितले. त्यामुळे सारच्यांसह विवाहीत मुलीच्याही पायाखालची वाळू सरकली. तसेच आपण दोघेही सध्या पुण्यात असून तिला माघारी पाठवण्याची व्यवस्था करायची आहे, त्यासाठी 10 हजार रूपये पाठवा असेही त्या जावायाने सांगितले आहे. त्यानंतर सासरच्यांनी तसे केले देखील मात्र मुलगी घरी परतलेली नाही. त्यामुळे जावईची नजर आता अल्पवयीन मुलीवर पडल्याचेच समोर आले आहे. तर यानंतर सासरच्यांनी आपली मुलगी परत पाठविण्यासाठी वारंवार विनवण्या केल्या. तरिदेखील मुलीला जावयाने सोडलेले नाही. त्यानंतर सासरच्यांनी कापूसवाडगाव येथील जावयाचे घर गाठून व्याह्यांना सर्व माहिती दिली. मात्र त्यानंतर ही मुलगी घरी परतली नसल्याने मुलीच्या वडिलांनी वैजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीवरून पोलिसांनी जावई, त्याचे वडील, मित्र अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.