Pune : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या नावाखाली आर्थिक फसवणूक, भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
अनेकदा लोकांना शासकीय योजना माहित नसतात. माहित असल्यातरी त्याचा फायदा कसा घ्यायचा हे सुध्दा माहित नसतं. शुभांगी काळे यांना कर्जाची गरज असल्याचे दोन फसवणूक करणाऱ्या इसमांच्या लक्षात आले.
पुणे : महाराष्ट्र शासन संचालनालय (Directorate of Government of Maharashtra) आणि जिल्हा उद्योग केंद्र मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यांच्याकडे ओळख असल्याचं दोघांकडून महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना पुण्यातील (Pune) भोर (Bhor) तालुक्यातली आहे. कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचं महिलेच्या लक्षात आल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राज पाटील आणि शाम गवळी अशी गुन्हा दाखलं करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. आरोपींनी फेब्रुवारी 2021 पासून वेळोवेळी तक्रारदार महिलेकडून फोन पे, गुगल पे तसेच डायरेक्ट खात्यात पैसे जमा करण्यास सांगून हजारो रुपयांची फसणूक केली आहे. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तक्रारदार शुभांगी काळे यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.
नेमकं काय झालं
अनेकदा लोकांना शासकीय योजना माहित नसतात. माहित असल्यातरी त्याचा फायदा कसा घ्यायचा हे सुध्दा माहित नसतं. शुभांगी काळे यांना कर्जाची गरज असल्याचे दोन फसवणूक करणाऱ्या इसमांच्या लक्षात आले. त्यानंतर दोघांनी जिल्हा उद्योग केंद्र मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यांच्याकडून तुम्हाला कर्ज मंजूर करून देतो अशी बतावणी केली. त्यानंतर महिलेला खरंच कर्ज मिळणार असे वाटल्याने ती त्यांच्या संपर्कात राहिली. मागच्या एक वर्षापासून दोन इसमांनी अनेक वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे निदर्शनास आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने राज पाटील आणि शाम गवळी यांच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिस दोघांचा कसून शोध घेत आहे.
आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर अनेक प्रकरणं उघडकीस येण्याची शक्यता
आत्तापर्यंत त्यांनी अनेक जणांची फसवणूक केली असल्याची पोलिसांना शंका आहे. त्यामुळे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाच्या योजनांच्या नावाखाली महाराष्ट्र अनेकांची फसवणूक केली जात आहे. आत्तापर्यंत अनेकांची फसवणूक झाल्याचे वारंवार उघडकीस आले आहे. तरीही असे प्रकार महाराष्ट्रात घडत आहेत.