Kanpur firing : नाद करा, पण यांचा कुठं! 300 रुपयांवरुन सुनेशी वाद, 3 तास सासऱ्याचा थेट पोलिसांवरच गोळीबार
Kanpur Firing News : गोळीबारानंतर पळापळ झाली. पोलिसांनी वरीष्ठांना कळवलं. अधिक फोर्स मागवली.
सुनेसोबत एका सासऱ्याचं भांडण झालं. 300 रुपयांवरुन वाद घातला गेला. संतापलेल्या सासऱ्यानं आपल्या वृद्ध पत्नीला आणि सुनेला एका खोलीत बंद केलं. त्यांना जिवंत जाळण्याची धमकी दिली. घाबरलेल्या सूनेनं पोलिसांना (Crime News) कळवलं. पोलीस गाडी घेऊन घराबाहेर पोहोचले. पोलिसांना बघून सासरेबुआ अधिकच संपातले आणि त्यांनी तर थेट पोलिसांवरच गोळीबार (Firing on Police) केला. थोडाथोडका नाही, तब्बल तीन तास चकमक सुरु होती. सासरेबुआंनी सगळ्यांनाच वेठीस ठरलं. चाळीस ते पंचेचाळीस गोळ्या या सासऱ्यानं पोलिसांवर झाडल्या. त्यात पोलिसांच्या गाडीचंही नुकसान झालं. शिवाय दोघे पोलीस शिपाई जखमीही झाले. तब्बल 3 तास हा सगळा थरार सुरु होता. अखेर पोलिसांनी सासरेबुवांना ताब्यात घेतलं आणि अद्दल घडवली. हा सगळा प्रकार घडला कानपूरमध्ये (Kanpur Firing News). गोळीबार करत धुडगूस घालणाऱ्या या सासरेबुवांच्या संतापामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
…असं झालं भांडण!
कानपूरच्या श्याम नगरमधील सी ब्लॉगमध्ये राहणाऱ्या आरके दुबे या 60 वर्षांच्या इसमानं हे कृत्य केलंय. दुबे शेअर मार्केटिंगचं काम करतात. दुबेंसोबत पत्नी किरण गुबे, मुलगा सिद्धार्थ दुबे, सून भावना दुबे आणि दिव्यांग मुलगी एकत्र राहतात. आरके दुबेंचा धाकटा मुलगा आणि सून वेगळे राहतात. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सून भावनासोबत त्यांचा वाद झाला. वीज बिलाच्या तीनशे रुपयांवरुन दोघांमध्ये वाजलं. आर के दुबेंना राग आला. सुनेला त्यांनी एका खोलीमध्ये डांबलं. शिवाय मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या पत्नीलाही तिच्यासोबत खोलीत बंद केलं.
पोलीस आले धावून
सून घाबरली. भयभती झाली. तिने पोलिसांना फोन फिरवला. मदतीसाठी पोलिसही तत्काळ गाडी घेऊन पोहोचले. पोलिसांना पाहून आरके दुबे आणखीनंच भडकले. त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. घराला आग लावून टाकेन, म्हणत सगळ्यांनाच धारेवर धरलं.
आरे के दुबेंनी पोलिसांवर ओरडण्यास सुरुवात केली. मी स्वतः पीडित आहे, आणि मलाच पकडायला येता, असं म्हणत दमदाटी केली. नंतर आपली डबल बॅरल बंदूक काढली आणि थेट पोलिसांवरच ताणली. मग एकामागून एक गोळ्याही झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या थोडक्यात पोलीस शिपायांना लागता लागता राहिल्या असल्या तरी जखमी करुन गेल्या.
जम्मू काश्मीर सारखी चकमक
गोळीबारानंतर पळापळ झाली. पोलिसांनी वरीष्ठांना कळवलं. अधिक फोर्स मागवली. डीसीपी आले. एसीपी आले. एडीसीपीही मोठा ताफा घेऊन घटनास्थळी पोहोचले. पण संतापलेले सासरेवुआ कुणाचच ऐकायल तयार नव्हते. त्यांनी गोळीबार सुरुच ठेवला.
पाहा व्हिडीओ :
#Kanpur-घरेलू विवाद में वृद्ध ने इलाके में की फायरिंग,पिता और पुत्र के आपसी विवाद के बाद फायरिंग,सूचना पर पहुँची पुलिस पर भी आरोपी ने की फायरिंग,छर्रे लगने से सिपाही घायल,चकेरी थाना क्षेत्र के श्यामनगर इलाके की घटना।@Uppolice @kanpurnagarpol #abcnewsmedia pic.twitter.com/NBpcZIWVkp
— Abcnews.media (@abcnewsmedia) June 19, 2022
जोपर्यंत पोलिसाचं सस्पेशन होत नाही, तोपर्यंत गोळीबार थांबणार नाही, अशी धमकीच सासरेबुवांनी दिली. यावर डीसीपींनी एक शक्कल लढवली. सासरेबुवांना दाखवण्यासाठी म्हणून एक बनावट सस्पेन्शन लेटर तयार करुन घेतलं. ते त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवलं. तेव्हा जाऊन गोळीबार थांबला. गोळीबार थांबल्यानंतर पोलिसांनी लगेचच सासरेबुवांच्या मुसक्या आवळल्या.
सगळा राडा.. असा झाला..
- दुपारी 12 वाजता सूनेनं पोलिसांना तक्रार दिली. सासरेबुवांच्या मारहाणीबाबत पोलिसांनी कळवण्यात आलं.
- 12.20 मिनिटांनी पोलिस आल्याचं पाहून आर के दुबेंनी गोळीबार सुरु केली
- 12.35 वाजता अतिरीक्त फोर्स दाखल झाली.
- 1 वाजता डीपीसी, सहाय्यक डीसीपी आणि एसीपीही पोहोचले.
- 3 वाजता पोलिसाचं निलंबन केल्याचा पोलिसांनी सासरेबुवांना भासवलं
- 3.30 मिनिटांनी पोलिसांनी सासरेबुवांना ताब्यात घेतलं.