आधी बापाला पेटवलं, आता आईचा गळा कापला; नोकरी मिळविण्यासाठी मुलगा झाला हैवान
२००८ मध्ये संतोषने दुसरे लग्न केले. दुसऱ्यांदा त्याने स्वतःच्या मर्जीने प्रेमविवाह केला. दुसऱ्या लग्नानंतर संतोषची पहिली पत्नी त्याच्या वडिलांजवळ राहत होती. यामुळं नाराज मुलाने २०११ मध्ये पेट्रोल टाकून आपल्या वडिलांना जीवंत जाळले.
नवी दिल्ली : बिहारच्या (Bihar) मधेपुरा येथे एका सनकी मुलाने धारदार हत्याराने गळा कापून आपल्या आईचा खून (Murder) केला. त्याने त्यासाठी आपल्या दुसऱ्या पत्नीची मदत घेतली. यापूर्वी २०११ मध्ये त्याने पेट्रोल टाकून वडिलांना पेटविलं होतं. ही घटना मधेपुरा क्षेत्रातील मुरलीगंजच्या रहटा गावात घडली. चिरैया देवी असं मृतक महिलेचं नाव आहे. या खुनाचा आरोप चिरैया देवीचा छोटा मुलगा संतोष यादव यांच्यावर लागला. संतोष यादवचे लग्न २००७ मध्ये त्याच्या वडिलांनी लावून दिले. परंतु, लग्नानंतर तो आनंदी नव्हता. २००८ मध्ये संतोषने दुसरे लग्न केले. दुसऱ्यांदा त्याने स्वतःच्या मर्जीने प्रेमविवाह केला. दुसऱ्या लग्नानंतर संतोषची पहिली पत्नी त्याच्या वडिलांजवळ राहत होती. यामुळं नाराज मुलाने २०११ मध्ये पेट्रोल टाकून आपल्या वडिलांना जीवंत जाळले.
सरकारी नोकरीसाठी रचला कट
संतोषने आपल्या वडिलांच्या हत्येनंतर अनुकंपा तत्वावर सरकारी नोकरीसाठी पत्नीसोबत कट रचून आईलाही संपविले. आईचा खून करताना संतोषच्या मोठ्या भावाने पाहिले.
तेव्हा संतोषने त्याच्यावरही हल्ला केला. त्यानंतर मोठा भाऊ आपल्या मुलांसह गेला. तेव्हा संतोष पत्नीसह मागच्या रस्त्याने पळाला. संतोषच्या मोठ्या मुलाने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी हत्यार जप्त केला.
संपत्तीसाठी आईची हत्या
संतोषने आपली पत्नी रुबी देवीसह मिळून दहा वर्षांपासून संपत्ती हडप करण्यासाठी प्रयत्न करत होता. आरोपीने काका आणि मोठ्या भावावर खोटे आरोप लावले.
काकांची जमीन हडपण्याचा प्रयत्न
संतोषच्या काकांना मुलंबाळ नाहीत. त्यांची जमीन हडप करण्यासाठी त्यांना मारहाणही केली होती. सर्व कागदपत्रांवर अंगठ्याचे निशाण घेतले होते. आपली आई आणि मोठा भाऊ यांच्यावर आपल्या मुलांच्या अपहरणाचा आरोप लावला होता.
जेलमध्ये काढावे लागणार दिवस
या प्रकरणामुळं मुलगा किती क्रूर राहू शकतो, याची जाणीव झाली. त्याने संपत्तीसाठी आणि नोकरीसाठी आपल्या वडील तसेच आईलाही संपवायला मागेपुढं पाहिलं नाही. आता त्याला शेवटची दिवस जेलमध्ये काढावे लागणार आहेत.
अशा मुलाबद्दल संताप
संतोषने केलेल्या या खून प्रकरणामुळं संताप व्यक्त केला जात आहे. ज्या मुलाला लहानाचे मोठे केले त्याने आपल्या जन्मदात्या आईवडिलांसोबत असं वागणं योग्य नव्हतं. पण, संपत्ती आणि नोकरीच्या आमिषाने त्याने जन्मजात्या आईवडिलांनाचं संपविले. या खळबळ उडाली आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी चांगले संस्कार करण्याची गरज आहे.