Akasa Airlines : काय बोलायचं? विमानात चक्क टॉयलेटमध्ये विडी ओढण्याचा धक्कादायक प्रकार

Akasa Airlines : भारतात कुठे घडली ही घटना? हा प्रवासी पहिल्यांदाच विमान प्रवास करत होता का? पकडल्यानंतर या प्रवाशाने जे सांगितलं, त्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या.

Akasa Airlines : काय बोलायचं? विमानात चक्क टॉयलेटमध्ये विडी ओढण्याचा धक्कादायक प्रकार
smoking in flight
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 4:07 PM

बंगळुरु : अलीकडे भारतात विमान प्रवासात प्रवाशांनी क्रू मेंबर्सशी गैरवर्तन केल्याच्या घटना वाढल्या आहेत. एयरहोस्टेसशी छेडछाड, सहप्रवाशावर लघुशंका असे बरेच प्रकार घडले आहेत. आता, तर एका प्रवाशाने विमानात चक्क विडी ओढल्याची घटना घडली आहे. बंगळुरुला जाणाऱ्या अकासा एअर लाइन्सच्या विमानात हा प्रकार घडला. संबंधित प्रवाशाला केम्पीगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. आरोपी 56 वर्षांचा आहे.

विमान बंगळुरुतील एअरपोर्टवर लँड होताच, संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली. एअर लाइन्सच्या ड्युटी मॅनेजरने KIA पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. सहप्रवाशांची जीव धोक्यात घातल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

पोलिसांसमोर आरोपी काय म्हणाला?

आरोपी राजस्थानच्या मारवार भागातील आहे. प्रवीण कुमार असं आरोपीच नाव आहे. अहमदाबाद येथून तो विमानात बसला. टॉयलेटमध्ये ध्रुमपान करताना त्याला क्रू मेंबरने पकडलं. प्रवीण कुमारला बंगळुरुच्या सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलं. तिथे त्याने आयुष्यात पहिल्यांदा विमान प्रवास करत असल्याच सांगितलं. नियमांची आपल्याला कल्पना नव्हती, असं तो पोलिसांना म्हणाला.

ट्रेनच्या टॉयलेटमध्ये मी विडी ओढायचो

“मला ट्रेनने नियमित प्रवास करण्याची सवय आहे. ट्रेनच्या टॉयलेटमध्ये मी धुम्रपान करतो. तीच गोष्टी मी इथे सुद्धा करुन शकतो, असं मला वाटलं. त्यामुळे मी विडी ओढत होतो” असं आरोपी म्हणाला. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय.

सुरक्षा तपासणीत प्रवाशाकडे विडीच पाकिट आढळून आलं नाही. ही गंभीर आहे, असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. यावर्षाच्या सुरुवातीला विमानात सिगारेट ओढल्याबद्दल दोन जणांना अटक करण्यात आली होती.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.