सासरच्यांना भेटून आला, रात्री उशिरापर्यंत गावकऱ्यांसोबत गप्पा, सकाळी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत, घरातल्या पाच जणांचा रहस्यमय मृत्यू

हरियाणाच्या पलवल जिल्ह्ल्यातील एका गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचे रहस्यमय अवस्थेत मृतदेह आढळले आहेत. विशेष म्हणजे संबंधित कुटुंबात सर्व काही चांगलं सुरु होतं.

सासरच्यांना भेटून आला, रात्री उशिरापर्यंत गावकऱ्यांसोबत गप्पा, सकाळी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत, घरातल्या पाच जणांचा रहस्यमय मृत्यू
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 5:24 PM

चंदिगड : हरियाणाच्या पलवल जिल्ह्ल्यातील एका गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचे रहस्यमय अवस्थेत मृतदेह आढळले आहेत. विशेष म्हणजे संबंधित कुटुंबात सर्व काही चांगलं सुरु होतं. कुटुंबाचा कर्ता पुरुष असलेला 33 वर्षीय नरेशने मंगळवारी (28 सप्टेंबर) गावातील गाकऱ्यांसोबत रात्री उशिरापर्यंत गप्पा मारल्या होत्या. त्याचबरोबर तो आपल्या कुटुंबासोबत त्याच्या सासरी फिरुन आला होता. तो किंवा त्याच्या कुटुंबातील कुणीही नैराश्यात नव्हतं. त्यामुळे या कुटुंबातील पाच जणांच्या अचानक संशयास्पद मृत्यूने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही बुधवारी (29 सप्टेंबर) सकाळी उघडकीस आली. सकाळ होऊन बराच काळ झाला तरी नरेशच्या कुटुंबातील कुणीच घराबाहेर पडलं नव्हतं. त्यामुळे शेजारच्यांनी घराची खिडकी उघडून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. यावेळी नरेश पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तर त्याची 30 वर्षीय पत्नी आरती, मुलगी भावना (वय 9), मुलगा संजय (वय 7) आणि पुतनी रविता (वय 11) अंथरुणावर मृतावस्थेत आढळले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलीस घटनास्थळी दाखल

संबंधित घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्यात आले. मृतक नरेशचा चुलत भाऊ देखील माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाला होता. नरेश हा झांसी येथे ढाबा चालवायचा. त्याचं कुणाहीसोबत भांडण नव्हतं, अशी माहिती त्याच्या चुलत भावाने पोलिसांना दिली.

मृत्यूमागे नेमकं कारण काय?

या संपूर्ण कुटुंबाच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय? ते अद्याप समजू शकलेलं नाही. गावच्या सरपंचांनी पोलिसांना नरेश आपल्या सासरहून नुकताच घरी आला होता, अशी माहिती दिली. तसेच घटनेच्या आदल्यारात्री त्याने रात्री अकरा वाजेपर्यंत गावातील इतर नागरिकांसोबत भरपूर गप्पा मारल्या. त्याच्या बोलण्यातून तो नैराश्यात आहे, असं वाटत नव्हतं, अशी माहिती गावच्या सरपंचांनी पोलिसांना दिली.

शवविच्छेदनाच्या अहवालात महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून सध्या तपास सुरु आहे. पण पोलिसांना अद्याप कोणतेही नमूद पुरावे मिळालेले नाहीत. सर्व मृतदेहांच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वूपूर्ण माहिती मिळेल, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. नरेशने स्वत: घरातील सर्व जणांची हत्या करुन आत्महत्या केली की त्यामागे आणखी दुसरं कारण आहे ते आता पोलीस तपासातून स्पष्ट होईल. पण संपूर्ण कुटुंबाचा अशा रहस्यमयरित्या मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

नाशिकमधल्या प्रख्यात अशोका बिल्डरची फसवणूक; माजी संचालकाने घातला गंडा, गुन्हा दाखल

जळगावमध्ये हात-पाय बांधून डॉक्टर तरुणीवर बलात्कार; दुसऱ्यासोबत लग्न केल्यास ठार मारण्याची धमकी

नागपूरच्या गजबजलेल्या मार्केट परिसरात देहविक्रीचा धंदा, लॉजवर पोलिसांचा सापळा, अखेर तरुणीचा सुटका, आरोपीला बेड्या

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.