रात्री तिथे हसण्याचे आवाज येत होते, सकाळ होताच पसरली शोककळा; लग्नाच्या दिवशीच ‘त्याने’… नववधूही नाही वाचली !

लग्नघरात आनंदाचं वातावरण होतं, नववधूला घरात येऊन काही दिवसही उलटले नव्हते. मात्र रात्री सर्वजण झोपायला गेल्यावर जे घडलं ते पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

रात्री तिथे हसण्याचे आवाज येत होते, सकाळ होताच पसरली शोककळा; लग्नाच्या दिवशीच 'त्याने'... नववधूही नाही वाचली !
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 12:08 PM

लखनऊ : लग्न घरात आनंदाचं वातावरण होतं. लग्न उत्तम पार पडल्याने सर्वजण निश्चिंत होते. वरातीसोबत नववधूला घेऊन सगळे घरी आले. जेवण वगैरे होऊन, गप्पा मारत झाल्यावर सगळे झोपायला गेले. दमल्याने सगळ्यांनाच गाढ झोप लागली होती. मात्र तेवढ्यात जीवघेण्या किंकाळीने सगळ्यांनाच जाग आली. गच्चीवर नववधू आणि पतीची क्रूरपणे हत्या (newly married couple killed) करण्यात आली होती… आणि हातात धारदार हत्यार घेऊन मारेकरी इतरांवर वार करण्यासाठी पुढे सरसावला… तो मारेकरी दुसरा तिसरा कोणी नसून घरातील सर्वात मोठा मुलगा होता. त्याने त्याचा छोटा भाऊ, त्याची नवविवाहीत पत्नी यांसह पाच जणांना (brother killed family members) ठार केले आणि गोळी झाडून स्वत:चाही जीव घेतला….!

एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही कथा दुर्दैवाने प्रत्यक्षात घडली असून त्यात पाच निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे हा थरारक प्रकार घडला सून त्यामुळे सर्वांचेच हृदय हेलावले आहे. जिल्ह्यातील अरसारा गावात घरातील मोठ्या मुलाने कुटुंबातील सदस्य आणि नातेवाइक अशा पाच जणांची क्रूरपणे हत्या केली. एवढेच नव्हे तर आरोपीने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली.

मैनपुरीच्या किष्णी पोलिस स्टेशन हद्दीतील अरसारा गोकुळपूर गावात शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री हे भीषण हत्याकांड घडले. सुभाष यादव (६५) यांचा धाकटा मुलगा सोनू यादव (२३) याचे गुरुवारी लग्न झाले. वरात घेऊन सर्व कुटुंबिय इटावा जिल्ह्यातील गंगापूर येथे गेले आणि नववधूला वाजत गाजत घरी घेऊन आले.

रात्री हसत होते, सकाळ होताच घरात पसरली शोककळा

लग्नामुळे घरात हसतं-खेळतं वातावरण होतं. काही नातेवाईक घरी परतले तर काहींचा तिथेच मुक्काम होता. शुक्रवारी रात्री हसत-हसत जेवणं पार पडली, थोडफार नाचगाणंही झालं. त्यानंतर काहीजण झोपायला खोलीत तर काही गच्चीवर गेले. मात्र, मध्यरात्री सुभाष यादव यांचा मोठा मुलगा सोहवीर यादव याला अचानक काय झालं कळलं नाही. तिरमिरीत तो उठला आणि गच्चीवर जाऊन त्याने नवविवाहीत भाऊ आणि त्याच्या पत्नीची हत्या केली. धारदार शस्त्राने वार करून त्याने दोघांचाही जीव घेतला.

मात्र, तो तिथेच थांबला नाही, त्या हैवानाने खाली येऊन एका खोलीत झोपलेल्या आणखी एका छोट्या भावाची तसेच मेव्हण्याची हत्या केली. कुटुंबियांच्या जवळच्या मित्रालाही त्याने सोडले नाही, दीपक नामक तरूणाचीही त्याने धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.

पत्नीवरही केले वार, नंतर केली आत्महत्या

एवढेच नाही तर, अतिशय अमानुषपणे वागणाऱ्या आरोपीने त्याची पत्नी आणि मामीलाही सोडले नाही. त्या दोघींवरही त्याने हल्ला केला, ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. या सगळ्यामुळ घरात एकच कल्लोळ माजला आणि सर्वजण आरोपीला पकडायला धावले. मात्र तो त्यांच्या हातातून निसटला आणि त्याने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. आरडाओरडा ऐकून घरात आणि बाहेर झोपलेले इतर लोकही जागे झाले. जिथे काही वेळापूर्वी मंगलमय, आनंदी वातावरण होते, तिथे सर्वत रक्ताचा सडा पसरला होता.

या क्रूर हल्ल्यानंतर नवविवाहित जोडप्यासह ५ जणांचा जीव गेला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली आरोपीची पत्नी आणि मामी आक्रोश करत होत्या. आसपासच्या लोकांच्या मदतीने दोन्ही महिलांना मैनपुरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांती प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने इटावा जिल्ह्यातील सैफई मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आले.

नववधूचा गृहप्रवेश होऊन दोन दिवसही झाले नव्हते

या घटनेनंतर घरात व आसपासच्या परिसरात शोककळा पसरली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घरातील ज्येष्ठ सदस्य सुभाष यादव यांच्याकडे चौकशी करून या घटनेमागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मुलांच्या मृत्यूमुळे व्यथित झालेले सुभाष यादव कसेबसे बोलत होते.

त्यांनी सांगितले की, त्यांचा मोठा मुलगा आणि आरोपी सोहवी हा शहरातील सरकारी रुग्णालयाबाहेर फोटोकॉपीचे काम करायचा. गेल्या काही दिवसांपासून दुकानात तोटा सहन करावा लागल्याने तो नातेवाईकांकडे काही पैशांची मागणीही करत होता. यावरून घरात वादही झाला होता. मात्र, घरात लग्नाचे वातावरण असल्याने सगळं थोडावेळ शांत झालं. आनंदाचे वातावरण होते. नवीन सून दोन दिवसांपूर्वीच घरात आली आणि तेवढ्यात हे मोठं हत्याकांड झालं.

ती गाढ झोप काळझोप ठरली

झोपेत असलेल्या लोकांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी तपासणीत आढळून आले. लग्नामुळे दमले-भागलेले जीव गाढ झोपेत असतानाच त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. कोणीही हल्लेखोराचा प्रतिकार करू शकले नाहीत. आरोपीने त्याचे दोन भाऊ, नवविवाहीत भावाची पत्नी, तसेच त्याचा मेव्हणा आणि एक मित्र अशा पाच लोकांची हत्या केली. त्यानंतर गोळी झाडून स्वत:चे आयुष्यही संपवले.

जखमी महिलांच्या जबाबाकडे लक्ष

या निर्घृण हत्येमागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. हल्लेखोराची जखमी पत्नी व मामी या बऱ्या झाल्यावरच त्यांच्याकडून काही माहिती मिळू शकेल. मात्र, दोन्ही महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचा जबाब आत्ता नोंदवता येणार नाही. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.