Crime News : ते दरवाजात येताच, पिंकी-ज्योतीने बहिणीच कर्तव्य बजावलं, पण भाऊ मात्र….
Crime News : पिंकी आणि ज्योतीची काय चूक होती? त्यांच काही या प्रकरणाशी देण-घेणं सुद्धा नव्हतं. पण त्यांनी बहिणीच कर्तव्य बजावलं. दोघींच लग्न झालेलं. दोघींचे संसार होते. मुलं होती.
नवी दिल्ली : दिल्लीच्या आरेक पूरम आंबेडकर वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आज पहाटे भयानक अनुभव आला. नागरी वस्तीमध्ये असं काही घडले याची कोणी कल्पनाही केली नव्हती. पहाटे चारच्या सुमारास अचानक गोळीबार सुरु झाला. लोक साखर झोपेत असताना, आरोपींनी वस्तीमधील एका घरावर हल्लाबोल केला. आरोपींनी केलेल्या गोळीबारात दोन बहिणींचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या आरोपींना अटक केलीय. मायकल आणि अर्जुन आरोपींची नाव आहेत.
आरोपींच्या गोळीबारात पिंकी आणि ज्योति या दोन बहिणींचा मृत्यू झाला. आरोपी ललितला मारण्यासाठी आले होते, असं कुटुंबीयांनी सांगितलं. भावाला वाचवण्यासाठी बहिणी समोर गेल्या.
का घडली घटना?
आरोपींच्या गोळीबाराता दोघींना आपले प्राण गमवावे लागले. घरातील सदस्य रेखाने दिलेल्या माहितीनुसार, ललितने एका आरोपीकडून 15 हजार रुपये उधारीवर घेतले होते. या पैशांच्या वसुलीसाठी घरी गुंड पाठवण्यात आले. ललिल नात्यामध्ये रेखाचा दीर लागतो. पेशाने तो ड्रायव्हर आहे.
त्यांचा समज चुकीचा ठरला
रेखाने सांगितलं की, आज पहाटेच्या सुमारास अचानक 15-20 संख्येमध्ये आरोपी आले. त्यांनी घरचा दरवाजा तोडण्याचा प्रवेश केला. पण भितीपोटी कोणी दरवाजा उघडला नाही. काहीवेळाने आरोपी पुन्हा आले व त्यांनी गोळ्या घालायला सुरुवात केली. घरच्या भिंतीवर गोळ्या चालवल्या. त्याचवेळी भावाला वाचवण्यासाठी ज्योति आणि पिंकी बाहेर गेल्या. आरोपी आपल्यावर गोळ्या चालवणार नाहीत, असं त्यांना वाटलं. पण आरोपींनी त्यांच्यावर सुद्धा गोळ्या झाडल्या. दोघींच लग्न झालेलं
ललित घराच्या बाहेर येताच आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. पण तो बचावला. गोळ्या लागल्यानंतर दोन्ही बहिणी रक्ताच्या थारोळ्यात तिथे कोसळल्या. तत्काळ त्यांना सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं. पण दोघींचा मृत्यू झाला. पिंकी आणि ज्योतीच लग्न झालं होतं. पिंकी मोठी बहिण होती.तिला दोन मुली आहेत. छोटी बहिण ज्योतीला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे.