‘त्या’मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले वाळू माफिया फरार, गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंडेंनी दिले होते चौकशीचे आदेश
बीडच्या गेवराई तालुक्यातील शहाजांपूर चकला येथे वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात बुडून चार ऊसतोड मजुरांच्या मुलांचा मृत्यू झाला होता. या दरम्यान गेवराई तालुक्यातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. आता आणि याप्रकरणातील आरोपी फरारी आहेत.
बीड: बीडच्या गेवराई तालुक्यातील शहाजांपूर चकला येथे वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात बुडून चार ऊसतोड मजुरांच्या मुलांचा मृत्यू झाला होता. या दरम्यान गेवराई तालुक्यातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा (Sand extraction) प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. सामाजिक न्याय (Social justice) व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनीदेखील या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश (Minister of Special Assistance) दिले होते. त्यानंतर याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी समितीची नियुक्त केली होती. याप्रकरणी मृत मुलांच्या नातेवाईकांनी पोलीस तक्रार दाखल होऊनही यामधील संशयित आरोपी फरार झाले आहेत.
त्यानुसार या समितीने अहवाल देताच मृत मुलांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पांडुरंग चोरमले, विलास निर्मल, संदीप निर्मल आणि अर्जुन कोळेकर या चार वाळू माफियांविरोधात मुलांच्या मृत्यी प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उसतोड कामगारांच्या मुलांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर व पोलीस तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील वाळू माफिया फरार झाले आहेत. यातील सर्व आरोपी फरार आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्यांना पोलीस कधी ताब्यात घेणार असा सवाल उपस्थित होतो.
शहाजांपूर चकला येथे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो, वाळू उपसा केल्यामुळे सिंदफणा नदीतमध्ये खोल खड्डे पडले आहेत. सततचा वाळू उपसा होत असल्याने नदीपात्रात अनेक धोकादायक खड्डे तयार झाले आहेत. या धोकादायक तयार झालेल्या खड्यामुध्येच उसतोड कामगारांच्या मुलांचा बुडून मृत्यू झाला होता.
मृत्यूची टांगती तलवार
यानंतर याप्रकरणातील व्यक्तिविरोंधात तक्रार दाखल झाली होती, मात्र आता ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, ते फरार आहेत, त्यामुळे यापक्रणातील ज्यांची मुलं पाण्यात बुडून मृत झालेत त्यांना न्याय मिळणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. उसतोड कामगार मोलमोजरीसाठी वेगवेगळ्या कामासाठी जात असतात, मात्र त्यांनी योग्य ते संरक्षण आणि त्यांची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे आई वडिलांबरोबर ऊस तोडीसाठी भटंकती करणाऱ्या मुलांना धोका हा कायमच असतो कारण ऊस तोड सुरू झाली की, आई वडिलांचे काम सुरू होते. आणि शेतात किंवा जवळ कुठे असणारी पाण्याची ठिकणं, नदी नाले यांचा धोका हा ठरलेला असतो.
चौकशीचे आदेश असतानाही आरोपी फरार
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुलांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असतानाही यामधील वाळू माफिया फरार झाले आहेत. त्यामुळे नातेवाईकांसह नागरिकांना संताप व्यक्त केला आहे. मुलांच्या मृत्यूप्रकरणी कारणीभूत असलेले आणि पोलिसात गुन्हा दाखल होऊनही आरोपी फरार कसे काय होऊ शकतात असा सवाल नागरिकांनी केला आहे.
संबंधित बातम्या