परदेशी सहलीचे आकर्षक पॅकेजचे आमिष दाखवत डॉक्टरला गंडा, पकडले जाऊ नये म्हणून नाना शकला लढवल्या, पण मुंबई पोलिसांचा दराराच भारी, शेवटी…

सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी महिला डॉक्टर परदेशी सहलीचा प्लान आखत होती. यासाठी तिने ऑनलाईन पॅकेज बुक केले होते. मात्र पॅकेजचे पैसे भरल्यानंतर तिला कंपनीकडून काहीच प्रतिसाद आला नाही.

परदेशी सहलीचे आकर्षक पॅकेजचे आमिष दाखवत डॉक्टरला गंडा, पकडले जाऊ नये म्हणून नाना शकला लढवल्या, पण मुंबई पोलिसांचा दराराच भारी, शेवटी...
परदेशी सहलीच्या बुकिंगद्वारे फसवणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 1:31 PM

मुंबई : सुट्टी पडण्याआधीच पिकनिकचा बेत आखतात. केवळ देशातच नव्हे तर परदेशातही जाण्यासही लोकं वाढती पसंती देत आहेत. याचाच गैरफायदा उठवणाऱ्या मंडळींनी डोके वर काढले आहे. मलबार हिल पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर परदेशात टूरचा बेत आखणाऱ्या लोकांनी टूर पॅकेज करताना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. एका महिला डेंटिस्टला मालदीवच्या पर्यटन सहलीसाठी आकर्षक पॅकेजचे आश्वासन देऊन फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी पंजाबच्या पीर मुचाला येथील आरोपी लव गुप्ता याला अटक केली आहे. डोंटिस्ट महिलेने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसद्वारे (यूपीआय) गुप्ताच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले होते. मात्र व्यवहार झाल्यानंतर गुप्ताकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे डेंटिस्ट महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपीने केले नाना उद्योग

आरोपी लव गुप्ताला अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. आपला अजिबात मागमूस लागू न देण्यासाठी गुप्ताने विविध शक्कल लढवल्या होत्या. पोलीस त्याचा मागोवा घेण्यासाठी फोन कॉल्स करायचे, त्यावेळी तो वारंवार स्वतःचा आवाज बदलत होता. इतकेच नव्हे तर यादरम्यान त्याने वेगवेगळ्या मोबाईल नंबरचा वापर केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

त्याचबरोबर आरोपीने आपण स्वतःच टूरिस्ट कंपनीचे एक कर्मचारी आणि मालक असल्याचे चित्र उभे केले होते. फसवणूक करताना कुणाला संशय येऊ नये म्हणून त्याने व्हॉईस मॉड्युलेशनमध्ये विशेष कौशल्य वापरले. अशा परिस्थितीत ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी त्याच्या बँक खात्याच्या तपशीलांची अगदी बारकाईने छाननी केली. या छाननीदरम्यान पोलिसांना गुप्ता हा मूळचा हिमाचल प्रदेशचा रहिवाशी असल्याचे उघड झाले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत गुप्ताचा शोध घेत त्याला पंजाबमधून अटक केली.

हे सुद्धा वाचा

फोन लोकेशन डेटामध्ये तीन राज्यांचा उल्लेख

गुप्ताच्या फोन लोकेशन डेटामध्ये हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणा अशा तीन वेगवेगळ्या राज्यांचा उल्लेख दिसला. तथापि, जेव्हा तपासकर्त्यांनी गुप्ताच्या खाते क्रमांकावरून अतिरिक्त माहिती गोळा केली, त्यावेळी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. कारवाईवेळी गुप्ताने जवळपास अर्धा तास स्वत:ला राहत्या घरात कोंडून घेतले होते. त्यामुळे त्याला ताब्यात घेताना पोलिसांना प्रतिकार करावा लागला. यावेळी पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांची मदत घेऊन गुप्ताला पकडले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.