Cyber Fraud: सावधान! ओमिक्रॉन चाचणीच्या नावाखाली होतेय फसवणूक; सायबर गुन्हेगार झाले सक्रीय

सध्या ओमिक्रॉनची रुग्णसंख्या जसजसी वाढत चालली आहे, तसतशी सायबर गुन्हेगारी वाढत चालली आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या युक्त्या वापरून सायबर गुन्हे घडवून आणत आहेत. निष्पाप लोकांची फसवणूक करण्यासाठी ते वेगाने पसरत असलेल्या विषाणू संसर्गाचा फायदा उठवत आहेत.

Cyber Fraud: सावधान! ओमिक्रॉन चाचणीच्या नावाखाली होतेय फसवणूक; सायबर गुन्हेगार झाले सक्रीय
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 12:41 AM

नवी दिल्ली : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण देशभरात वाढू लागले आहेत. रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर आता सायबर ठगदेखील सक्रिय झाले आहेत. कोरोनाच्या तसेच ओमिक्रॉनच्या मोफत चाचणीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. सायबर गुन्हेगार ओमिक्रॉन व्हेरिएंटची ऑनलाइन चाचणी मोफत देऊन लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे केंद्राच्या अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे. या फसवणुकीच्या प्रकारांबद्दल सावधानता बाळगण्याच्या सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केल्या आहेत.

केंद्र सरकारच्या अॅडव्हायझरीमध्ये काय म्हटलेय?

सायबर आणि माहिती सुरक्षा विभाग तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाने एक अॅडव्हायझरी जारी केली आहे. त्यात लिहिले आहे की, सायबर गुन्हेगारांनी आरोग्याच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून सायबर सुरक्षेच्या त्रुटींचा गैरफायदा घेत आहेत. सायबर गुन्हेगार नेहमीच नवीन क्लृप्त्या शोधत असतात. नागरिकांची फसवणूक करण्याचे मार्ग त्यांना सापडतात. अशाच प्रकारे ते सध्या कोरोना महामारीत सक्रीय होऊन लोकांना लुटण्याचे कारस्थान रचत आहेत. सध्या ओमिक्रॉनची रुग्णसंख्या जसजसी वाढत चालली आहे, तसतशी सायबर गुन्हेगारी वाढत चालली आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या युक्त्या वापरून सायबर गुन्हे घडवून आणत आहेत. निष्पाप लोकांची फसवणूक करण्यासाठी ते वेगाने पसरत असलेल्या विषाणू संसर्गाचा फायदा उठवत आहेत.

अशाप्रकारे फसवणूक केली जातेय

सायबर गुन्हेगार ओमिक्रॉन संसर्गाच्या पीसीआर चाचणीसंदर्भात बनावट लिंक्स तसेच या विषाणूशी संबंधित फाइल्ससह ईमेल पाठवत आहेत. सरकारी आणि खासगी आरोग्य सेवेच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. लिंकवर क्लिक करणाऱ्या नागरिकांना फसवणूक करणाऱ्यांनी तयार केलेल्या बनावट वेबसाइटवर नेले जाते, जे सरकारी/खाजगी आरोग्य सेवांसारखे दिसतात, जेथे नागरिक COVID-19 Omicron PCR चाचणीसाठी अर्ज करू शकतात. अशा प्रकारे मोफत ओमिक्रॉन चाचणीचे प्रलोभन दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. (Fraud under the name of Omicron test, Cyber criminals became active)

इतर बातम्या

UP Crime: बहिणीचे लग्न मोडण्यासाठी इन्स्टाग्रामवर उघडले नवरदेवाचे बनावट अकाऊंट; गुन्ह्याचा हेतू ऐकून पोलिसही चक्रावले

UP Crime: एकतर्फी प्रेमातून विद्यार्थीनीची हत्या; दोन मित्रांच्या मदतीने प्रियकराने रचला कट

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.