जुना वाद उफाळून आला, मग मित्रांनीच मित्राचा काटा काढला !
जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आला. मग मित्रांनीच तरुणासोबत भयंकर कृत्य केले. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.
गुरुग्राम : दोन वर्षाचा वाद उफाळून आला आणि तिघा मित्रांनी मिळून तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना हरयाणातील गुरुग्राममध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. ललित, अशोक आणि दिनेश अशी अटक आरोपींची नावे आहेत. गुरुग्राममधील सोहना येथील खेडला गावात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मयत तरुणाच्या भावाच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तिघा आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. जयस्ट्री उर्फ टोनी असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे.
काही तासात आरोपींना अटक
टोनीची हत्या केल्यानंतर आरोपी तेथून फरार झाले होते. मात्र पोलिसांनी कसून शोध घेत काही तासातच आरोपींना खेडला गावातील जंगलातून ताब्यात घेतले. सर्व आरोपी आणि मयत दमदमा गावाजवळील फार्म हाऊसबाहेर दारु पित होते. यावेळी आरोपी आणि मयताच्या दोन वर्षापूर्वी झालेल्या वादाचा विषय निघाला. मग यावरुन पुन्हा वाद झाला. वाद विकोपाला गेला अन् आरोपींनी दगडांनी ठेचून टोनीची हत्या केली. हत्या करुन आरोपी फरार झाले.