Crime : वहिनीच्या संपत्तीवर डोळा? दिराचा वहिनीसह पुतणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; औरंगाबादमधील धक्कादायक घटना
बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आणि जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील कोनड गावात ही धक्कादायक घटना घडलेय. मंगलाबाई परिहार यांच्या पतीचे गेल्या पाच महिन्यापूर्वी निधन झाल्याने त्या आपल्या दोन मुलीसह गावाजवळ असलेल्या त्यांच्या शेतामध्ये राहतात, मंगलाबाई परिहार यांना मुलगा नसल्यामुळे त्यांच्या संपत्तीवर त्यांचा दिर समाधान परिहार हा डोळा ठेवून असल्याने, तो वारंवार वाद घालत होता त्यातूनच त्यने त्यांची आणि मुलींची हत्या करण्याचा प्रयत्न केला.
औरंगाबाद: संपत्तीच्या लालसे पोटी(property dispute) सख्या दिराने आपली मोठी वहिनी सह तिच्या दोन मुलींना जिवंत जाळण्याचा(Attempt to burn ) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये(Aurangabad) घडली आहे. यामध्ये मायलेकी भाजल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार केल्यावर पुढील उपचारासाठी औरंगाबादला नेण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ सुरु आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आणि जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील कोनड गावात ही धक्कादायक घटना घडलेय. मंगलाबाई परिहार यांच्या पतीचे गेल्या पाच महिन्यापूर्वी निधन झाल्याने त्या आपल्या दोन मुलीसह गावाजवळ असलेल्या त्यांच्या शेतामध्ये राहतात, मंगलाबाई परिहार यांना मुलगा नसल्यामुळे त्यांच्या संपत्तीवर त्यांचा दिर समाधान परिहार हा डोळा ठेवून असल्याने, तो वारंवार वाद घालत होता त्यातूनच त्यने त्यांची आणि मुलींची हत्या करण्याचा प्रयत्न केला.
2 जुलै रोजी रात्री आरोपी समाधान रामसिंग परिहार याने कट रचून, तिघी मायलेकी घरामध्ये झोपलेल्या असताना रात्री तीन वाजता चे सुमारास त्यांच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावली, याची भनक लागताच तिघी मायलेकींनी आटापिटा करत कसा बसा घरातून पळ काढला, मात्र बाहेर येताच समाधान रामसिंग परीहार याने दोघी मायलेकी च्या अंगावर, पाठीवरील पंपाने पेट्रोल सिंपडून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये मंगलाबाई परिहार तसेच पूनम परिहार या दोघी मायलेकी जळून गंभीर जखमी झाल्या असून, ज्ञानेश्वरी परिहार या छोट्या मुलीने तिथून पळ काढल्याने ती थोडक्यात बचावली. जखमी मायलेकींवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याच्यावर औरंगाबाद ला उपचार सुरू आहेत.
या घटने मुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोपी समाधान परिहार वर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी मंगलाबाई परिहार यांच्या नातेवाईकांनी केल आहे. पोलिसांनी सुद्धा आरोपी समाधान परिहार बर जाफराबाद पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.