चार चाकीचा भीषण अपघात, स्पीडमध्ये असलेलं वाहन पूलावरुन खाली कोसळलं, नंतर…
देवरी येथून मित्राच्या लग्नाचा कार्यक्रम आटोपून परत शिरपूरकडे येत असताना रात्री २.३० च्या दरम्यान वाहन वरील नियंत्रण सुटल्याने सदर अपघात झाला आहे.
गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातल्या कुरखेडा (kurkheda) तालुक्यातील लेंडारी गावानजीक अनियंत्रित चारचाकी पुलावरून खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात दोन व्यक्ती गंभीर जखमी (two young boy injured) झाल्या असून त्यांना जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेत सरफराज खालिद शेख वय 24 रा. शिरपुर हा जखमी झाला आहे. त्याचबरोबर प्रणय पुरुषोत्तम उईके (गांगोली) हा गंभीर झाला असून त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली आहे.
४ ही दरवाजे लॉक झाले होते
देवरी येथून मित्राच्या लग्नाचा कार्यक्रम आटोपून परत शिरपूरकडे येत असताना रात्री २.३० च्या दरम्यान वाहन वरील नियंत्रण सुटल्याने सदर अपघात झाला आहे. ज्या लेंडारी नाल्यावर हा अपघात झाला. ते क्षेत्र निर्जन असल्याने व वाहन पुलाखाली पडल्याने रात्रभर कुठलीही प्रकारची मदत मिळाली नाही. अपघातामध्ये वाहनाचे ४ ही दरवाजे लॉक झाले होते. रात्रभर वाहनात अडकून असलेल्या अपघातग्रस्तांना सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान धावण्या करिता आलेल्या एका मुलाने बघितले. त्याने यांना वाहनातून बाहेर निघण्यासाठी मदत केली.
त्याचबरोबर मोबाईल शोधून कुरखेडा येथील सोहम कांबळे यास सदर घटनेची माहिती दिली. सोहमने चारचाकी वाहन घेवून मित्रांसमवेत घटना स्थळाकडे धाव घेत घटना स्थळावरुन जखमींना कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचार करिता ब्रम्हपुरी येथे अस्थी तज्ज्ञाकडे उपचाराकरिता घेवून गेल्याची माहिती आहे.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्याकडून आदिवासी युवकाची हत्या, युवकाला गोळी घालून हत्या केल्याची माहिती
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत क्षेत्रातील मर्दहूर येथील साईनाथ नरोटे वय 26 या युवकाची नक्षलवाद्यांनी हत्या केली. पोलीस घटनास्थळ गाठून मृतदेह दुपारपर्यंत भामरागडला आणणार आहेत. साईनाथ नरोटे हा गडचिरोली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता, होळीच्या सुट्टीला तो आपल्या गावाकडे गेले होता. नक्षलवाद्यांनी त्याला घरातून उचलून नेले, त्यानंतर त्याची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे.