Salman Khan ला जीवेमारण्याची धमकी देणारा लॉरेन्स बिश्नोई ‘या’ १० लोकांची करणार हत्या? NIA चौकशीत मोठा खुलासा

फक्त सलमान खान नाही तर, लॉरेन्स बिश्नोई हिच्या निशाण्यावर आणखी १० लोक; त्यांची देखील हत्या करणार असल्याचा गँगस्टरने NIA चौकशीत केला खुलासा..

Salman Khan ला जीवेमारण्याची धमकी देणारा लॉरेन्स बिश्नोई 'या' १० लोकांची करणार हत्या?  NIA चौकशीत मोठा खुलासा
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 2:51 PM

मुंबई : अभिनेता सलमान खान याला जीवेमारण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) चौकशीत मोठी कबुली दिली आहे.. ज्यामुळे लॉरेन्स लॉरेन्स बिश्नोई पुन्हा चर्चेत आला आहे. चौकशीत लॉरेन्स बिश्नोई याने फक्त सलमान खान यालाच नाही तर आणखी ९ जणांना जीवे मारणार असल्याची कबुली दिली आहे. लॉरेन्स बिश्नोई याच्या यादीत १० जण आहेत, ज्यांना कुख्यात गुंड जीवे मारणार आहे.. धक्कादायक गोष्ट म्हणजे कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या यादीमध्ये पहिलं नाव सलमान खान याचं आहे… तर लॉरेन्स बिश्नोई याच्या यादीतील अन्य नऊ जण कोणची आहेत.. याची कबुली देखील लॉरेन्स बिश्नोई याने दिली आहे… लॉरेन्स बिश्नोई याच्या कबुलीनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे..

एनआयएच्या चौकशीत बिश्नोईने मोठा खुलासा केला आहे. जोधपूरमध्ये ज्या काळवीटाची शिकार सलमान खानने केली त्याची बिश्नोई समाज पूजा करतो. या कारणामुळे लॉरेन्स बिश्नोई याला सलमान खानला जीवे मारायचं आहे.. धक्कादायक गोष्ट म्हणजे भाईजानची रेकी करण्यासाठी संपत नेहराला मुंबईत पाठवल्याची कबुलीही त्याने दिली, मात्र त्याला एसटीएफने अटक केली.

शगुनप्रीत – बिश्नोई याच्या यादीत दुसऱ्या स्थानी शगुनप्रीत आहे.. शगुनप्रीत पंजाबचा गायक सिद्धू मुसेवालाची मॅनेजर आहे. शगुनप्रीत गायकाचे एकाउंट सांभाळायचा. लॉरेन्सच्या म्हणण्यानुसार, शगुनप्रीतने लॉरेन्सच्या अगदी जवळ असलेल्या विक्की मुद्दुखेडाच्या मारेकऱ्यांना लपण्यासाठी मदत केली होती.

हे सुद्धा वाचा

मनदीप धालीवाल – देखील निशाण्यावर असल्याची माहिती बिश्नोई याने NIA ला दिली आहे. विक्की मुद्दुखेडा याच्या मारेकऱ्यांना लपण्यासाठी मनदीप याने मदत केली होती. म्हणून बिश्नोई याला मनदीप धालीवाल याची हत्या करायाची असल्याचं त्याने चौकशीत सांगितलं..

कौशल चौधरी – लॉरेन्सच्या म्हणण्यानुसार, कौशल चौधरी माझा दुश्मन आहे. कौशल चौधरीने विक्की मुद्दुखेडा याचे मारेकरी भोलू शूटर, अनिल लठ आणि सनी लेफ्टी यांना शस्त्रे पुरवली होती.

अमित डागर – एनआयएने केलेल्या चौकशीत गुंडाने सांगितले की, विकी मुद्दुखेडा यांच्या हत्येचा कट अमित डागर आणि कौशल चौधरी यांनी रचला होता. यामुळेच त्यांना अमित डागरला जीवे मारायचं आहे..

सुखप्रीत सिंह बुद्धा – लॉरेन्स म्हणाला, बमबिहा माझ्या शत्रूंची टोळी आहे.. देवेंद्र बमबिहा याच्या निधनानंकर सुखप्रीत सिंह बुद्धा त्याती टोळी सांभाळत आहे.. माझा जवळचा मित्र अमित शरणच्या हत्येमागे सुखप्रीत सिंगचा हात असल्याचं देखील लॉरेन्स याने सांगितलं..

लक्की पटियाल – लॉरेन्स म्हणाला, लक्की याच्या म्हणण्यावर माझा मित्र गुरलाल बरार याची हत्या करण्यात आली होती. यानेच विक्की मुद्दुखेडा याच्या मारेकऱ्यांना आणि रेकी करणाऱ्यांना लपण्यासाठी जागा दिली होती..

रम्मी मसाना – लॉरेन्स याच्या यादीमध्ये रम्मी मसानाचं देखील नाव आहे.. रम्मी मसाना हत्या करून लॉरेन्स याने अमनदीप याच्या हत्येचा बदला घ्यायचा आहे..

भोलू शूटर, सनी लेफ्टी आणि अनिल लठ – भोलू शूटरशिवाय अनिल लठ आणि सनी लेफ्टी यांचा देखील लॉरेन्सच्या यादीत समावेश आहे. लॉरेन्स बिश्नोई सांगतो की, कौशल चौधरीच्या सांगण्यावरूनच या तिघांनी विक्की मुद्दुखेडाची हत्या केली.

शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.