Video : गँगस्टर राजू ठेहट याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या! राजस्थान हादरलं, पाहा CCTV
राजस्थानमध्ये पुन्हा एकदा गँगवॉर! धक्कादायक सीसीटीव्ही फुटेजही समोर, हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात?
राजस्थान : सीकर मधील कुख्यात गँगस्टर राजू ठेहट याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. राजू ठेहट याच्या घराबाहेरच हे हत्याकांड घडलं. भरदिवसा त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या हत्येनंतर सीकर हादरुन गेलं आहे. राजू ठेहटच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगमधील लोकं असल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे या हत्येप्रकरणी एका गँगने जबाबदारी घेतली असून आपण बदला घेण्यासाठी राजूची हत्या केली असल्याचं त्यांनी म्हटलंय.
राजू ठेहट याच्या हत्येची जबाबदारी घेणाऱ्या गँगचं नाव आनंदपाल असं आहे. आनंदपाल गँग आणि लॉरेन्स बिश्नोई गँग एकत्रत काम करत होती. आता आनंदपाल गँगने राजूच्या हत्येचा कट आखल्याचं कबूलही केलंय.
दरम्यान, राजू ठेहट याची हत्या करुन पळून जाण्याच्या प्रयत्न असणारे मारेकरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दरम्यान, चालता चालता करण्यात आलेल्या गोळीबारदरम्यान, एक गोळी रस्त्यावरील व्यक्तीला लागली. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय.
महत्त्वाचं म्हणजे यावेळी तब्बल 50-60 राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यामुळे परिसरात एकच दहशत माजली होती. आज सकाळी राजू ठेहट घराबाहेर पडला होता. तेव्हा आधीच काही जण त्याला टार्गेट करण्यासाठी दबा धरुन बसले होते.
दरम्यान, राजूला पाहून त्यांनी बंदुकीतून गोळ्या झाडल्या आणि राजूच्या चिंधड्या उडवल्या. गोळ्या झाडल्या जाण्याच्या आवाजनंतर आजूबाजूचे लोक राजूच्या दिशेने धावले.
रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या राजूला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तिथे त्याला डॉक्टरांनी उपचाराआधीत मृत घोषित केलं. या घटनेनंतर पोलिसांनी आता जागोजागी नाकाबंदी केली आहे. पोलिसांनी राजूचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
पाहा व्हिडीओ :
गैंगस्टर राजू ठेठ की हत्या करने के बाद असलहा लहराते हुए भागे बदमाश… pic.twitter.com/bm6fcDCzLz
— Asheesh Kumar Mishra (@Asheesh17604450) December 3, 2022
हत्याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. काही पथकं या घटनेतील आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी तैनात करण्यात आली असून लवकरच मारेकऱ्यांना अटक केली जाईल, असा विश्वास स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.
धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोरांपैकी एकाने या घटनेचा व्हिडीओही बनवलाय. हा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागलाय. सदरव्हिडीओमध्ये पांढऱ्या रंगाची एक ऑल्टो कार लुटली आणि त्याच कारमधून सर्व मारेकरी पळून गेले. RJ 21 CA 8273 क्रमांकाची ही अल्टो कार होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पंजाबसह हरियाणा सीमेवरही पोलिसांकडून चोख नाकाबंदी करण्यात आली आहे. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांकून आता शोध मोहीम राबवली जातेय.