तरुणी आणि तिच्या प्रियकराने आत्महत्या केली, कारण बाहेर आल्यानंतर…
Palghar Police : पोलिसांना सोमवारी एका पालघर मधील व्यक्तीने खबर दिली की, एका झाडाला दोन व्यक्तींनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले.
पालघर : पालघर जिल्ह्यातील (Maharashtra) २० वर्षाच्या एक तरुणीने आणि तिच्या १९ वर्षीय प्रेयसीने आत्महत्या (suicide) केली आहे. ज्यावेळी आत्महत्या झाली, त्यावेळी पोलिसांनी तिथं जाऊन परिस्थिती समजून घेतली. पोलिसांना शंका आहे की, दोघांच्या लग्नाला त्यांच्या घरातून विरोध असावा. तिथल्या एका व्यक्तीला दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर त्या व्यक्तीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. तलासरी येथील पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, या प्रकरणातील दोघांचे मृतदेह संशयास्पद आहेत. पोलिसांनी (Police) दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून जवळच्या सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांना या गोष्टीचा संशय
अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे की, त्यांच्या कुटूंबियांना या नातं मान्य नव्हतं. तसेचं त्यांचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे त्या दोघांनी आत्महत्या केली आहे. दोघांच्याही घरच्यांनी लग्नाला नकार दिल्यामुळे दोघांनी आत्महत्या केली आहे. पालघर मधील ग्रामीण पोलिसांनी त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणात चौकशी करीत आहेत.
पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या
29 मार्चला महाराष्ट्र पोलिस कर्मचारी वैभव कदम याने सुध्दा आत्महत्या केली आहे. वैभव कदमचा मृतदेह निलजे आणि तलोजा स्टेशनच्यामध्ये रेल्वे पटरीवरती मिळाले होते. रेल्वे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरणी माजी राज्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेत पोलीस कॉन्स्टेबल कदम तैनात होते. अनंत करमुसे प्रकरणाबाबत वैभवचीही चौकशी करण्यात येत होती.