VIDEO | भगवती किल्ल्यावरुन तरुणी 200 फूट खोल दरीत, मृतदेहाजवळ केकचा बॉक्स सापडला

रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग भगवती किल्यावरुन दोनशे फूट खोल दरीत पडल्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला. (Girl Ratnadurg Bhagawati Fort Ratnagiri)

VIDEO | भगवती किल्ल्यावरुन तरुणी 200 फूट खोल दरीत, मृतदेहाजवळ केकचा बॉक्स सापडला
रत्नागिरीत दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 2:34 PM

रत्नागिरी : रत्नदुर्ग भगवती किल्ल्यावरुन दोनशे फूट खोल दरीत पडून तरुणीचा मृत्यू झाला. मात्र तिच्या मृतदेहाजवळ रुमाल आणि केकचा बॉक्स आढळल्याने गूढ वाढलं आहे. तरुणीने आत्महत्या केली की तिच्यासोबत घातपात झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. (Girl falls at Ratnadurg Bhagawati Fort in Ratnagiri mystery deepens)

आत्महत्या, खून की अपघात?

रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग भगवती किल्यावरुन दोनशे फूट खोल दरीत पडल्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला. 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह सोमवारी सायंकाळी पोलिसांच्या मदतीने दरीतून वर काढण्यात आला. ही तरुणी कोण आहे, तिने आत्महत्या केली, अपघाताने तिचा पाय घसरुन ती खोल दरीत पडली, की तिच्यासोबत घातपात झाला, या संदर्भात पोलिस तपास करत आहेत.

मृतदेहाजवळ रुमाल आणि केकचा बॉक्स

भगवती किल्ल्याखाली दोनशे फूट खोल दरीत 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह सापडलेल्या ठिकाणी केकचा बॉक्स आणि एक रुमाल आढळून आला. सध्या ही तरुणी कोण होती, याचा शोध पोलिस घेत आहेत.

पाहा व्हिडीओ :

साताऱ्यातील बेपत्ता ट्रकचालकाचा मृतदेह घाटात

सातारा शहरालगत असणाऱ्या संगम माहुली येथील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह फेब्रुवारी महिन्यात घाटात सापडला होता. संतोष गोडसे हा वनवासवाडीत ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. पाटण तालुक्यातील उरुल घाटात त्याचा मृतदेह सापडल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. विटाने भरलेला ट्रक घेऊन तो पाटणला गेला होता. त्यावेळी गाडी घासल्यामुळे एका चालकासोबत त्याचा वाद झाला होता. मात्र अचानक 150 फूट खोल दरीत त्याचा मृतदेह सापडल्याने मृत्यूचे गूढ वाढले होते. (Girl falls at Ratnadurg Bhagawati Fort in Ratnagiri mystery deepens)

हेडफोन उचलताना तोल गेला, पुण्यात दरीत पडून युवकाचा अंत

तळेगावमधील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारे तीन युवक गेल्या वर्षी तिकोणा किल्ल्यावर फिरायला गेले होते. यावेळी हार्दिक माळीच्या मोबाईलचे हेडफोन काही फूट अंतरावर खाली पडले. ते उचलण्यासाठी हार्दिक कसरत करत होता, या प्रयत्नात तोल जाऊन वरण तळ्याच्या मागील बुरुजावरुन तो तब्बल 250 फूट खाली पडला होता. यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला.

संबंधित बातम्या 

प्रेयसीचं लग्न ठरल्याने नाराजी, नायर रुग्णालयातील 26 वर्षीय डॉक्टरच्या आत्महत्येचं गूढ उकललं

समलैंगिक संबंधातून क्षुल्लक वाद, पुण्यात मित्राने मित्राला संपवलं

(Girl falls at Ratnadurg Bhagawati Fort in Ratnagiri mystery deepens)

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.