Akola Crime : उपचाराच्या नावाखाली डॉक्टरकडून नको तिथे स्पर्श, कुठे घडली घटना?

किडनी स्टोनचा त्रास होत होता म्हणून तरुणी शहराती प्रसिद्ध स्पेशालिस्ट डॉक्टरकडे गेली. डॉक्टरने चेकअप करण्याच्या नावाखाली जे केले त्याने शहरात खळबळ उडाली.

Akola Crime : उपचाराच्या नावाखाली डॉक्टरकडून नको तिथे स्पर्श, कुठे घडली घटना?
अकोल्यात डॉक्टरकडून तरुणीचा विनयभंगImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 12:33 PM

अकोला / 2 सप्टेंबर 2023 : अकोल्यात उपचारासाठी गेलेल्या तरुणीला डॉक्टरने अश्लील स्पर्श करत तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. यानंतर तरुणीने रामदासपेठ पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सदर डॉक्टविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. प्रसिद्ध डॉक्टरने केलेल्या या प्रकारामुळे अकोला शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपी डॉक्टर फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

काय घडलं नेमकं?

पीडित तरुणी अमरावती येथे शिक्षणासाठी असते. रक्षाबंधनानिमित्त तरुणी अकोला येथे घरी आली होती. तरुणीला किडनी स्टोनचा त्रास आहे. यामुळे तरुणी शहरातील प्रसिद्ध हार्ट आणि किडनी स्टोन स्पेशालिस्ट डॉक्टरकडे भावासोबत गेली. डॉक्टरने भावाला बाहेर थांबवून तरुणीला एकटीला केबिनमध्ये चेकअपला घेतले. चेकअप करता करता डॉक्टर तिच्याशी अश्लील चाळे करु लागला.

चेकअप करताना डॉक्टरचेअश्लील कृत्य

चेकअप करताना डॉक्टरने तरुणीचे कपडे वर केले. मग तिच्या प्रायव्हेट पार्टला हात लावला. तरुणीने डॉक्टरला जाब विचारला असता आपण असेच चेकअप करतो असे डॉक्टरने सांगितले. यानंतर डॉक्टरचे कृत्य पाहून तरुणीने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून भाऊ आत आला. तरुणीने भावाला घडला प्रकार सांगितला. भावाने डॉक्टरला सुनावले. यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दोघा बहिण-भावाला बाहेर काढले.

हे सुद्धा वाचा

तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठत डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेनंतर डॉक्टर फरार झाला आहे. डॉक्टरने याआधीही एका महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याची माहिती मिळते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.