मॅसेज आणि कॉलिंगला उत्तर देत नव्हती, माथेफिरु तरुणाने एक्स गर्लफ्रेंडवर आधी अत्याचार केला, मग जे केले ते अतिशय घृणास्पद
इम्तियाज आणि पीडित तरुणी मुंबईत एकाच परिसरात राहतात. ते 2021 पासून एकमेकांना डेटिंग करत होते. मात्र नंतर इम्पिताजने तरुणीसोबत लग्नाला नकार दिला. यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा आल्याने तरुणीने आरोपीच्या फोनला आणि मॅसेजला उत्तर देणे टाळत होती.
मीरा रोड : खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एक्स गर्लफ्रेंडला लॉजवर भेटायला बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मीरा रोड येथे उघडकीस आली आहे. याप्रकरण पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. पीडित तरुणी आणि आरोपीमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्या नात्यात दुरावा आल्याने तिने त्याच्या मॅसेजला, कॉल्सला उत्तर देणे बंद केले. यामुळे प्रियकराने त्यांचे खाजगी व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला काशिमीरा येथील लॉजवर बोलावले. लॉजवर तिच्यावर बलात्काक केला. पीडितेने काशिमीरा पोलीस ठाणे गाठत सर्व आपबीती सांगितली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली. इम्तियाज चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपीने लग्नाला नकार दिल्याने त्यांच्यात दुरावा आला
इम्तियाज आणि पीडित तरुणी मुंबईत एकाच परिसरात राहतात. ते 2021 पासून एकमेकांना डेटिंग करत होते. मात्र नंतर इम्पिताजने तरुणीसोबत लग्नाला नकार दिला. यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा आल्याने तरुणीने आरोपीच्या फोनला आणि मॅसेजला उत्तर देणे टाळत होती.
यामुळे संतापलेल्या प्रियकराने खाजगी छायाचित्रे आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देत मीरा रोड येथे भेटायला बोलावले. त्याने काशिमिरा येथील एका लॉजमध्ये रुम बुक केली. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही खोलीत अनेक ठिकाणी थुंकले आणि तरुणीला ते चाटायला लावले.
सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पोलिसात तक्रार दिली
यानंतर तरुणीने कसेतरी स्वतःला सावरले आणि घरी परतली. यानंतर तिने सर्व घटना आपल्या मित्राला सांगितले. मित्राच्या सांगण्यावरुन तिने सामाजिक कार्यकर्त्याची मदत घेतली. यानंतर तिघांनी काशिमीरा पोलिस स्टेशन गाठत तरुणीच्या जबाबाच्या आधारे 1 फेब्रुवारीला एफआयआर नोंदवला.
आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल
काशिमीरा पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 376, 377, 354-बी, 323, 324, 506 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे समजताच चौधरीने आपला मोबाईल बंद केला आणि तो फरार झाला.
तो कधी कधी त्याचा सेलफोन चालू करतो आणि सतत त्याची ठिकाणे बदलत असतो. तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. आमची टीम त्याचा पाठलाग करत आहे आणि लवकरच आम्ही त्याला अटक करू, असे काशिमीरा पोलिसांनी सांगितले.