प्रेयसीने अर्ध्या रात्री प्रियकराला घरी बोलावलं, घरच्यांनी पकडलं, कपडे उतरवले अन् रात्रभर…

उत्तर प्रदेशातील एका गावात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला आहे. प्रेयसीच्या सांगण्यावरून तिच्या घरी गेलेल्या प्रियकाराला तिच्या कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी चांगलीच बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

प्रेयसीने अर्ध्या रात्री प्रियकराला घरी बोलावलं, घरच्यांनी पकडलं, कपडे उतरवले अन् रात्रभर...
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 11:30 AM

लखनऊ : प्रेयसीने रात्री घरी बोलवल्यावर तिच्या घरी जाणं प्रियकराला चांगलच महागात पडलं आहे. प्रेयसीने (girlfriend) बोलावल्यानंतर प्रियकरही (boyfriend) तिच्या घरी अर्ध्या रात्री गेला. प्रेयसीने एवढ्या रात्री बोलावल्याने त्याच्या मनात लड्डू फुटत होते. पण प्रेयसीच्या रुममध्ये गेल्यावर भलतच झालं. प्रेयसीच्या कुटुंबीयांनी त्याला पकडलं. त्याचे कपडे उतरवले आणि त्याला रात्रभर बेदम चोप दिला. त्यामुळे हा मजनू जखमी झाला आहे. शिवाय रात्री अपरात्री कुणाच्याही घरी जाणं कसं चुकीचं असतं याची अद्दलही त्याला घडली आहे.

रामपूर येथील अजीमनगर पोलीस ठाणे परिसरातील एका गावातील हे प्रकरण आहे. हा तरुण बाजूच्या गावातील मुलीवर प्रेम करत होता. दोघे एकमेकांना लपूनछपून भेटायचे. दोघांनी एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याच्या आणाभाकाही घेतल्या. तिचाही त्याच्यावर भरोसा बसला होता. त्यामुळे तिने त्याला रात्री 12 वाजात घरी बोलावलं. तोही तिच्या सांगण्यावरून तिच्या गावी गेला. संधी साधून तरुणीने त्याला आपल्या घरात बोलावलं. तोही घरात घुसला अन् घात झाला. कुणी तरी घरात आल्याची चाहूल कुटुंबीयांना लागली. त्यामुळे अख्खं घर जागं झालं.

शेजाऱ्यांनीही बदडलं

घरातल्या लोकांनी घरातील कोपरा न् कोपरा शोधला. त्यावेळी आपल्या लेकीच्या घरातच हा तरुण सापडला. या घरातील लोक आधी चोर चोर म्हणून ओरडले. त्यामुळे आजूबाजूचे लोकही घरात आले. त्यानंतर या सर्वांनी मिळून त्याचे सर्व कपडे काढून घेतले. त्याला घराबाहेरच्या झाडाला बांधून चांगलीच धुलाई केली. सर्वच जण एक एक करून त्याला मारहाण करत होते. त्याला प्रचंड मारहाण केल्याने हा तरुण रक्तबंबाळ झाला. त्याला मारहाण करतानाचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

लग्न लावून देण्याचं ठरलं

या तरुणाचे कारनामे त्याच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले. त्यानंतर त्याचे कुटुंबीय सकाळी सकाळीच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हे प्रकरण गावच्या पंचायतीत गेलं. पंचायतीने दोन्हीकडच्या बाजू ऐकून घेतल्या. त्या मुलीचं आणि मुलाचं म्हणणं ऐकून घेतलं. दोघांनीही आम्हाला लग्न करायचं असल्याचं पंचायतीला बिनधास्तपणे सांगून टाकलं. त्यानंतर दोन दिवसांनी या दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता ज्या घरात मार खाल्ला आता त्या घरातच लग्नाची तयारी सुरू झाली आहे. दोघेही दोन दिवसात बोहल्यावर चढणार आहेत.

व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, या तरुणाला झाडाला बांधून मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत तरुणाला बेदम मारहाण केली जात आहे. तर हा तरुण वाचवण्यासाठी गयावया करताना दिसत आहे. त्याच्या अंगातून घामाच्या आणि रक्ताच्या धारा वाहताना दिसत आहेत. दरम्यान, या घटनेची काहीच खबर मिळाली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.