Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिस यू बच्चा! तुझी खूप आठवण येते.. मला सोडून का गेला; प्रियकराच्या जाण्याच्या दु:खात प्रेयसीने स्वत:ला संपवले

प्रियकराच्या जाण्यानंतर प्रेयसीने लाईव्ह व्हिडीओ शेअर करत स्वत:चे आयुष्य संपवले आहे. आता पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

मिस यू बच्चा! तुझी खूप आठवण येते.. मला सोडून का गेला; प्रियकराच्या जाण्याच्या दु:खात प्रेयसीने स्वत:ला संपवले
Love AffairImage Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us
| Updated on: Mar 27, 2025 | 6:35 PM

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तुरुणीने २२ मार्च रोजी सल्फास (गव्हात मिसळलेले कीटकनाशक) खाऊन स्वत:ला संपवले आहे. या तरुणीचे वय केवळ २० वर्षे होते. तिने स्वत:ला संपवतानाचा लाईव्ह व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ पाहून सर्वत्र खळबळ उडाली. या तरुणीने स्वत:ला संपवण्यामागचे कारण प्रेमप्रकरण असल्याचे म्हटले जात आहे.

ही घटना मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यामध्य घडली आहे. तरुणीच्या मृत्यूपूर्वी मागील आठवड्यात, १५ मार्च रोजी याच परिसरातील दीपक नावाच्या तरुणाने विष प्राशन करून स्वत:ला संपवले होते. दीपक आणि निकिता दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. निकिताच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवले होते. त्यामुळे दीपकने नैराश्यामध्ये जाऊन स्वत:ला संपवल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर १५ दिवसांमध्येच निकाताने देखील लाइव्ह व्हिडिओ शेअर करत सल्फास खात स्वत:ला संपवले.

वाचा: ‘XL साईज काँडम आण… हॉटेलमध्ये…’, प्रसिद्ध उद्योगपतीला पत्नीचे अफेअर कळताच…

विष प्राशन केल्याची माहिती निकिताच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी तात्काळ आपल्या मुलीला रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी निकिताला मृत घोषित केले आणि पोलिसांनी तेथे पोहोचून निकिताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. याआधी निकिताचे एका तरुणासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हा तरुण निकिताचा प्रियकर दीपक होता ज्याने 15 मार्च रोजी स्वत:ला संपवले होते. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये निकिताने लिहिले आहे, ‘मिस यू बच्चा, मी तुला खूप मिस करत आहे. मला एकटे सोडून का निघून गेलास?’ निकिताच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवले होते. त्यामुळे दीपकने स्वत:चे आयुष्य संपवले होते. दोघांनीही स्वत:ला संपवल्यामुळे पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

७ दिवसांत दोन घटना

धार शहरातील निहाल नगरमध्ये आठवडाभरात झालेल्या दुसऱ्या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 15 मार्च रोजी दीपक नावाच्या तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून स्वत:ला संपवले होते. त्यानंतर अवघ्या 7 दिवसांनी म्हणजे 22 मार्च रोजी 20 वर्षीय निकिताने देखील विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवले.

कपलचे झाले होते फोटो व्हायरल

निकिता आणि दीपकचा एक फोटो समोर येताच या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. या व्हायरल झालेल्या फोटोमुळे त्या दोघांच्या आत्महत्येमागील कारणावरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गर्लफ्रेंड निकितानेही तिचा सल्फास खात असल्याचा लाइव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये निकिता एकामागून एक सल्फासच्या गोळ्या घेताना दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत नौगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील शर्मा यांनी सांगितले की, निकिताचा मोबाईल बंद असल्याने अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी निकिताचे कॉल डिटेल्स काढले असून या दोघांच्या आत्महत्येमागील कारण काय याचा सखोल तपास सुरू केला आहे. सत्य बाहेर येण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.