मुलीने पालकांच्या मनाविरुद्ध प्रियकराशी लग्न केले, संतापलेल्या बापाने थेट…

मुलीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. मात्र तिच्या पालकांना हे मान्य नव्हते. तरीही मुलीने विरोध जुगारुन प्रियकरासोबत संसार थाटला. पण बापाला मुलीचे कृत्य रुचले नाही.

मुलीने पालकांच्या मनाविरुद्ध प्रियकराशी लग्न केले, संतापलेल्या बापाने थेट...
मनाविरोधात लग्न केल्याने मुलीच्या बापाने जावयाला संपवले
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 9:24 PM

चेन्नई : घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. मुलीने आपल्याला विश्वासात न घेता लग्न केले तसेच तरुणाने देखील कुठलाही विचार न करता तिच्याशी लग्नगाठ बांधली. यामुळे संतापलेल्या सासऱ्याने आपल्या दोन नातेवाईकांसोबत घेऊन धारदार शस्त्राच्या सहाय्याने तरुणाची हत्या केली. तामिळनाडू राज्यातील कृष्णगिरी जिल्ह्यात मंगळवारी दिवसाढवळ्या ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत अधिक तपास सुरू केला आहे. जगन असे हत्या झालेल्या 28 वर्षीय तरुणाचे नाव असून तो किट्टमपट्टी येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जगन आणि सरण्या यांची काही महिन्यांपूर्वीच ओळख झाली होती. दोघेही एकाच समाजातील होते. यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. मात्र त्यांच्या प्रेमाला सरण्याच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. तरीही सरण्याने जगनशी विवाह केला. यामुळे सरण्याच्या घरचे नाराज होते. याचा प्रचंड राग सारण्या हिच्या वडिलांच्या मनात खदखदत होता. त्याच रागातून त्यांनी जगन याला जिवंत मारण्याचा कट रचला.

दुचाकीवरुन जात असताना जगनवर हल्ला

जगन हा मंगळवारी दुपारी दुचाकीवरून केआरपी धरणाजवळील महामार्गावरून चालला होता. त्याचवेळी सारण्याचा पिता शंकरने इतर तिघा साथीदारांच्या मदतीने जगनला रस्त्यातच गाठले आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात जगन रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडला. प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे जगनचा काही वेळातच मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

शंकरने तिघा जणांच्या मदतीने जगनवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. घटनेचे वृत्त समजल्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रहिवाशांच्या मदतीने जगनला रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र उपचार सुरू करण्याआधी त्याला मृत घोषित करण्यात आले.

जगनच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी रोखला महामार्ग

जगनवर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी तसेच मित्रमंडळींनी महामार्गावर धाव घेतली. घटनेचा निषेध करीत संतप्त नातेवाईकांनी महामार्ग रोखून धरला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन संतप्त जमावाला शांत केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, या घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या शंकरने न्यायालयात शरणागती पत्करली आहे.

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.