या सिरीअल किलरच्या प्रेमात पागल होत्या मुली, जेलमध्ये येत होते प्रेमपत्र; स्वतःला म्हणत होता…
एका प्रतिष्ठित मॅग्झीनची संपादक असलेली महिला त्याला भेटायला जेलमध्ये जात होती. तिनं काही प्रेमपत्रही त्याला पाठविले होते. या महिलेला सायको किलरबद्दल विचारलं असता ती म्हणाले, तो चांगला माणूस आहे.
नवी दिल्ली : सिरीयल किलरची स्वतःचे जग असते. एक सिरीयल किलर असा होता ज्याच्या प्रेमात मुली पागल होत्या. जेलमध्ये असताना त्याला शेकडो प्रेमपत्र येत होते. त्या प्रेमपत्र लिहिणाऱ्यांमध्ये काही मॉडल्स आणि अभिनेत्रीही होत्या. त्याने दोन मुलींसोबत साक्षगंध आणि एका मुलीसोबत लग्नही केले होते. हा सिरीयल किलर नाईट स्टॉकर नावाने कुख्यात होता. तो स्वतःला शैतानाचा दूत मानत होता. शेतानानं मला याचं कामासाठी पाठविलं असल्याचं तो सांगायचा. आपल्या २६ व्या वाढदिवसापर्यंत त्याने १३ खून आणि ११ बलात्कार केले होते.
नाईट स्टॉकर नावानं अमेरिकेच्या सिरीयल किलरचा जन्म २९ फेब्रुवारी १९६० साली झाला होता. तो मुळचा टेक्सास शहराच्या एल पासोतील रहिवासी होता. त्याचं खरं नाव रिचर्ड रेमिरेड असं होतं. खून केल्यानंतर तो शैतान नावाची निशाणी सोडत होता. तो शैतानाची पूजा करत होता त्यामुळं माध्यमाने त्याचे नाव नाईट स्टॉकर ठेवले होते. जगातून भ्रष्ट लोकांना नष्ट करण्यासाठी शैतानानं मला पाठविलं आहे, असं तो म्हणायचा.
हातोडा आणि चाकूने मारायचा
रेमिरेड आपली शिकार ही हातोडा आणि चाकूने करत होता. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याने भ्रष्ट लोकांना त्रास देऊन मारण्यात मजा येत असल्याचं सांगितलं. मारताना भ्रष्ट लोकं ओरडले की, त्यांचं दुःख तो एंजाय करायचा. आपल्या २६ व्या वाढदिवसापर्यंत त्याने १३ खून आणि ११ महिलांवर बलात्कार केला होता. एका मुलाखतीत त्याने सांगितलं की, खून केल्यानंतर त्याला बरं वाटायचं. खून केल्यानंतर तो त्या घरात फिरायचा. त्यात त्याला शांती मिळत असे. लोकांच्या मनात त्याच्याबद्दल सायको किलर म्हणून भीती होती.
मुली पाठवत होत्या प्रेमपत्र
या सायको किलर रेमिरेडच्या प्रेमात कित्तेक मुली पागल झाल्या होत्या. यात श्रीमंत घरच्या मुली, मॉडल्स आणि अभिनेत्री यांचा समावेश होता. यापैकी एक होती डोरीन लिओए. एका प्रतिष्ठित मॅग्झीनची संपादक असलेली महिला त्याला भेटायला जेलमध्ये जात होती. तिनं काही प्रेमपत्रही त्याला पाठविले होते. या महिलेला सायको किलरबद्दल विचारलं असता ती म्हणाले, तो चांगला माणूस आहे.
१९ वेळा सुनावली गेली फाशीची शिक्षा
रेमिरेडला १३ खून, ११ बलात्कारात दोषी ठरविण्यात आले. २० नोव्हेंबर १९८९ रोजी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. १९ वेळा फाशीची शिक्षा त्याला सुनावण्यात आली. द गार्डयननुसार, ७ जून २०१३ रोजी जेलमध्ये असताना लिव्हर फेल होऊन त्याचा मृत्यू झाला.