गोकुळ शुगरचे अध्यक्ष भगवान शिंदे यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला

सोलापुरातील मोदी स्मशानभूमी लगत असलेल्या रेल्वे रुळावर भगवान शिंदेंचा मृतदेह आढळला (Gokul Sugar Chairman found dead )

गोकुळ शुगरचे अध्यक्ष भगवान शिंदे यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 1:58 PM

सोलापूर : गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरचे चेअरमन होते. भगवान शिंदेंनी आत्महत्या केली, अपघात घडला की घातपात झाला, याचा तपास पोलीस करत आहे. (Gokul Sugar Chairman Bhagwan Shinde found dead near Railway Track)

सोलापुरातील मोदी स्मशानभूमी लगत असलेल्या रेल्वे रुळावर भगवान शिंदेंचा मृतदेह आढळला. गोकुळ शुगरचे चेअरमन असलेले भगवान शिंदे नेहमीप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी गेले होते. उशिरापर्यंत ते घरी परतले नसल्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली.

छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह सापडला

दरम्यान अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मोदी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पुलावरुन खाली पडल्याने छिन्नविछिन्न अवस्थेत पडल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. संबंधित मृतदेह हा भगवान शिंदे यांचा असल्याची नातेवाईकांनी खात्री केली.

भगवान शिंदे यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिंदे यांनी आत्महत्या केली, त्यांचा पुलावरुन पडून अपघाती मृत्यू झाला, की त्यांच्यासोबत घातपात घडला, हे अद्याप अस्पष्ट आहे. यासंबंधी पोलीस अधिक तपास करत आहेत.

कर्नाटक विधानपरिषद उपसभापतींचाही मृतदेह

कर्नाटक विधानपरिषदेचे उपसभापती एसएल धर्मेगौडा यांचा मृतदेह डिसेंबर महिन्याच्या अखेरीस रेल्वे रुळांवर आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. दक्षिण कर्नाटकातील चिकमगळुर या धर्मेगौडांच्या मूळगावात हा प्रकार घडला होता. एसएल धर्मेगौडा यांची सुसाईड नोट सापडल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं. त्यांच्या निधनाच्या अवघ्या 15 दिवसांपूर्वी कर्नाटक विधानपरिषदेत झालेल्या राड्यात चार आमदारांनी धरत उपसभापतींना खुर्चीतून खाली खेचल्याचं पाहायला मिळालं होतं.

रेल्वे लाईन ट्रायल दरम्यान चिरडून चोघांचा मृत्यू

उत्तराखंड येथील हरिद्वार जिल्ह्यात जानेवारीच्या सुरुवातीला रेल्वे दुर्घटना घडली होती. रेल्वे लाईनच्या डबल ट्रॅकच्या ट्रायलदरम्यान ट्रेनखाली चिरडून चौघा जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात जमालपूर कला गावाजवळ झाला होता. ट्रायलसाठी चालवण्यात आलेली गाडी 100 ते 120 किलोमीटर प्रतितास वेगाने धावत असताना रेल्वे रुळावरुन जात असलेले चौघे जण गाडीखाली येऊन जागीच मृत्युमुखी पडले होते.

संबंधित बातम्या 

Karnataka विधानपरिषदेत आमदारांनी खुर्चीवरुन खेचलेले उपसभापती रेल्वे रुळांवर मृतावस्थेत

हरिद्वारमध्ये मोठा रेल्वे अपघात, ट्रायल दरम्यान रेल्वेखाली चिरडून चोघांचा मृत्यू

(Gokul Sugar Chairman Bhagwan Shinde found dead near Railway Track)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.