Goldy Brar : गोल्डी ब्रारची नाही, मग अमेरिकेत कोणाची झाली हत्या? समोर आलं सत्य

Goldy Brar : भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड गुन्हेगार गोल्डी ब्रारची हत्या झाल्याची बातमी काल पसरली होती. पण ही बातमी म्हणजे अफवा आहे. गोल्डी ब्रार अजूनही जिवंत आहे. मग अमेरिकेत कोणाची हत्या झाली? ही अफवा कशी आणि कोणी पसरवली?

Goldy Brar : गोल्डी ब्रारची नाही, मग अमेरिकेत कोणाची झाली हत्या? समोर आलं सत्य
goldy brar
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 9:22 AM

गुन्हेगार गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या झाल्याचे मेसेज काल सोशल मीडियावर फिरत होते. गोल्डी ब्रार हा भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड गुन्हेगार आहे. गोल्डी ब्रार प्रसिद्ध पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाइंड आहे. गोल्डी ब्रारच्या हत्येच्या वृत्तामुळे भारतात विविध चर्चांना उधाण आलं होतं. आता या प्रकरणातील सत्य समोर आलय. अमेरिकेत हत्या झाली हे खरं आहे. पण तो गोल्डी ब्रारर नाहीय. हुबेहूब त्याच्यासारखा दिसणारा व्यक्ती आहे. त्यामुळे ही अफवा पसरली. ज्या व्यक्तीची हत्या झालीय, तो मूळचा आफ्रिकेचा राहणारा आहे. या व्यक्तीचा मृतदेह तिथून जाणाऱ्या एका पंजाबी व्यक्तीने पाहिला. त्याला वाटलं हा गोल्डी ब्रार आहे. त्यातून गोल्डी ब्रारची हत्या झाल्याची अफवा पसरली.

सर्वात आधी स्थानिक वेबसाइट फॉक्सने या हत्येच वृत्त दिलं. पण त्यांनी गोल्डी ब्रारच नाव लिहिलं नव्हतं. त्या आधारावर भारतीय मीडियाने या बातमीला गोल्डी ब्रारशी जोडलं व त्याची हत्या झाल्याची बातमी चालवली. सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या फेयरमोंट आणि होल्ट एवेन्यूमध्ये मंगळवारी संध्याकाळी 5.25 च्या सुमारास आफ्रिकी लोकांच्या दोन गटात भांडण झालं. त्यात एक व्यक्ती खाली पडला. त्याने स्वत:ला वाचवण्यासाठी अंदाधुंद गोळीबार केला. यात दोन जणांच्या पोटात आणि छातीत गोळी लागली. त्यांचा मृत्यू झाला.

गुन्हा न करताच स्वीकारली जबाबदारी

मरण पावलेल्या दोघांपैकी एकजण गोल्डी ब्रार सारखा दिसणारा होता. म्हणून तिथून जाणाऱ्या एका पंजाबी माणसाने गोल्ही ब्रारची हत्या झाल्याची अफवा पसरवली. इतकच नाही, भारतीय मीडियामध्ये गोल्डी ब्रारच्या हत्येसाठी प्रतिस्पर्धी गँग अर्श डल्ला आणि लखबीरला जबाबदार ठरवण्यात आलं. फेसबुकवर सुद्धा डल्ला गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली.

कॅलिफोर्निया पोलिसांनी काय सांगितलं?

कॅलिफोर्नियातील भारतीय वाणिज्य दूतावासातील अधिकाऱ्याने अमेरिकेच्या फ्रेज्नो पोलिसांशी गोल्डीच्या हत्येच तथ्य जाणून घेण्यासाठी संपर्क साधला. पोलिसांनी या संबंधी भारतीय वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांना काय सांगितलं? हे अजून समजलेलं नाहीय. पोलिसांनी जिथे हत्या झाली, तो भाग सील केलाय. प्रकरणाची चौकशी सुरु आहे. रात्री उशिरा फ्रेज्नो पोलिसांनी, मारल्या गेलेल्या दोन व्यक्तींपैकी एक गोल्डी ब्रार असल्याच्या वृत्ताच खंडन केलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.