बसस्टॉपवर बसची वाट पाहत बसली होती महिला, संधी साधत सोनसाखळी खेचून चोरटे पसार, पण…

मुलाला शाळेत सोडून महिला घरी जाण्यासाठी निघाली. बस पकडण्यासाठी महिला बसस्टॉपवर बसली होती. तितक्यात तिघे जण तेथे आले.

बसस्टॉपवर बसची वाट पाहत बसली होती महिला, संधी साधत सोनसाखळी खेचून चोरटे पसार, पण...
महिलेची सोनसाखळी चोरणारे तिघे अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 11:54 AM

मुंबई / गोविंद ठाकूर : बसस्टॉपवर बसची वाट पाहत असलेल्या महिलेची सोनसाखळी चोरुन पलायन करणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे. जिनेंद्र नरसिंग राव कोया, ऋषिकेश दळवी उर्फ ​​काल्या बाबू आणि आशिष यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. गोरेगाव पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यातच चैन स्नॅचिंग प्रकरणात आरोपी जिनेंद्र नरसिंग राव कोया आणि हृषिकेश दळवी उर्फ ​​काल्या बाबू यांना अटक केली होती. जे दोन दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आले आणि त्यांनी पुन्हा चैन स्नॅचिंग केले.

मुलाला शाळेत सोडायला गेली होती महिला

पीडित महिला मुलाला शाळेत गेली होती. मुलाला शाळेत सोडल्यानंतर महिला घरी जाण्यासाठी बस पकडण्यासाठी पाटकर कॉलेजजवळील बसस्टॉपवर बसली होती. यावेळी तीन आरोपी आले आणि महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळू लागले. महिला आरडाओरडा करत आरोपींना पकडण्यासाठी मागे धावू लागली. मात्र अॅक्टिव्हा गाडीवर बसून पसार झाले.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरटे जेरबंद

यानंतर महिलेने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळ आणि आसापासच्या परिसरातील 50 ते 60 सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित अॅक्टिव्हा गाडी दिसली. यात तीन जण गाडीवरुन चालले होते. पोलिसांनी या अॅक्टिव्हाची माहिती काढली. माहितीत अॅक्टिव्हाचा मालक सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांना कळाले.

हे सुद्धा वाचा

यानंतर पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांना अटक केली. गोरेगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासांत चोरट्यांना अटक केली. तिघेही आरोपी चैनस्नॅचर आहेत. तीन चेन स्नॅचर्सकडून दोन तोळे वजनाची सोन्याची चैन आणि चैन स्नॅचिंगमध्ये वापरलेली एक स्कूटी जप्त करण्यात आली आहे. आरोपींवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चैन स्नॅचिंग आणि चोरीचे 10 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.