गोरेगाव हादरलं! पतीने संपवलं जीवन, गळ्यातील चावीने दार उघडताच घरात डॉक्टर पत्नीचाही मृतदेह, नेमकं काय प्रकरण

मुंबईतील गोरेगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोरेगावमध्ये पतीने स्वत:ला संपवलं, त्यानंतर पोलिसांनी त्याची ओळख करून घरी जाताच पत्नीचाही मृतदेह त्यांना सापडल्याने खळबळ उडाली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.

गोरेगाव हादरलं! पतीने संपवलं जीवन, गळ्यातील चावीने दार उघडताच घरात डॉक्टर पत्नीचाही मृतदेह, नेमकं काय प्रकरण
Follow us
| Updated on: Aug 03, 2024 | 9:15 PM

मुंबईतील गोरेगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 58 वर्षीय किशोर पेडणेकर यांनी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारत आपलं जीवन संपवलं. त्यानंतर पोलीस आल्यावर त्यांच्या गळ्यातील दोन चाव्यांच्या मदतीन घर उघडल्यावर त्यांच्या पत्नीचा राजश्री पेडणेकर यांचा मृतदेह आढळून आला. गोरेगाव पश्चिम टोपीवाला लेनमध्ये घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.

२ ऑगस्टला पहाटे जवाहर नगर येथील टोपीवाला मॉलजवळ बीएमसी परिसरात एक व्यक्ती जखमी अवस्थेत होती. पोलीस घटनेच्या ठिकाणी पोहोचले जखमी व्यक्तीला दवाखान्यात नेलं होतं. मात्र त्याचा आधीत मृत्यू झालेला होता. या व्यक्तीची ओळख पटल्यावर त्यांचं नाव किशोर पेडणेकर असल्याचं समोर आलं. किशोर पेडणेकर यांच्या घरी पोलीस गेल्यावर त्यांचे घर लॉक होते.

घराची चावी नव्हती, मात्र किशोर पेडणेकर यांच्या मृतदेहाच्या गळ्यात दोन चाव्या होत्या. त्या चावीने दार उघडल्यावर पोलिसही हादरून गेले. कारण घरामध्ये पेडणेकर यांच्या पत्नी राजश्री पेडणेकर यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या मृतदेहाजवळ एक ओढणी होती. त्याच ओढणीने राजश्री पेडणेकर यांची गळा आवळून हत्या केल्याचा अंदाज पोलिसांना आहे. आत्महत्या करण्यापूर्वी किशोर पेडणेकर यांनी त्यांचा मुलगा आणि दिल्लीत राहणाऱ्या एका नातेवाईकासाठी विमानाची दोन तिकिटे काढली होती आणि आत्महत्येची माहिती देण्यासह मालमत्तेची माहिती व्हॉट्सॲपवर मेसेज केली होती.

राजश्री पेडणेकर या डॉक्टर होत्या, त्यांचे पती किशोर पेडणेकर हे वसईमध्ये खासगी नोकरी करत होते, दोघेही अडीच वर्षांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सध्या पोलिसांनी दोन वेगवेगळ्या एडीआर अंतर्गत एफआयआर नोंदवले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.