16 कोटींची किंमत, मुंबईहून आलेल्या चौघा रेल्वे प्रवाशांकडे सापडले 32 किलो सोन्याचे दागिने

पोलिसांनी चौघा प्रवाशांच्या सामानाची तपासणी केली असता, चार बॅगांमध्ये प्रत्येकी 8 किलो वजनाचे सोन्याचे दागिने लपवून ठेवल्याचे आढळले. हे पाहून पोलिसांनाही मोठा धक्का बसला. आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे

16 कोटींची किंमत, मुंबईहून आलेल्या चौघा रेल्वे प्रवाशांकडे सापडले 32 किलो सोन्याचे दागिने
मुंबई-भुवनेश्वर ट्रेनमधील प्रवाशांकडून सोने जप्तImage Credit source: एएनआय
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 9:50 AM

भुवनेश्वर : जीआरपी अर्थात रेल्वे पोलिसांनी तब्बल 16 कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने (gold ornaments) जप्त केले आहेत. मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेसने (Mumbai-Bhubaneswar Konark Express) प्रवास करणाऱ्या चौघा प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या चौघांकडून हस्तगत करण्यात आलेल्या सोन्याचे वजन तब्बल 32 किलो इतके आहे. बुधवारी ओदिशाची राजधानी भुवनेश्वर रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली. मुंबईतील हसमुख लाल जैन, सुरेश सहदेव खरे, महेश भोसले आणि दीपक पटेल या चार प्रवाशांनी ट्रेनमधून उतरल्यानंतर भुवनेश्वर स्थानकावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांना त्यांच्या हालचालींवर संशय आला.

पोलिसांनी चौघा प्रवाशांच्या सामानाची तपासणी केली असता, चार बॅगांमध्ये प्रत्येकी 8 किलो वजनाचे सोन्याचे दागिने लपवून ठेवल्याचे आढळले. हे पाहून पोलिसांनाही मोठा धक्का बसला. आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे

काय आहे प्रकरण?

संशयित आरोपी कर चुकवण्यासाठी रेल्वेतून सोन्याची अवैध वाहतूक करत होते. त्यांना हे सोने भुवनेश्वर आणि परिसरातील व्यापाऱ्यांना विकायचे होते. करचोरी, हवाला आणि मनी-लाँड्रिंगच्या दिशेने चौकशी करण्यासाठी आम्ही प्राप्तिकर विभाग आणि केंद्रीय जीएसटी शाखेसह सीमाशुल्क आणि आयकर अधिकार्‍यांना ताबडतोब कळवले, अशी माहिती एडीजी (रेल्वे आणि किनारी सुरक्षा) सुधांशू सारंगी यांनी दिली.

ना वैध कागदपत्रं, ना पावत्या

पोलिसांनी सांगितले की, प्रवाशांकडे दागिन्यांच्या कर पावत्यांसह कोणतीही वैध कागदपत्रे नाहीत. मुंबईत राहणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांच्या मूळ मालकाला चौकशीसाठी भुवनेश्वरमधील आयकर अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

काशीच्या मंदिराला 60 किलो सोने दान, गर्भगृह माँ हिराबेनांच्या वजनाइतक्या सोन्याचे; 18 व्या शतकानंतर दुसरा योग काय?

पुढच्या दोन वर्षांत लग्न करताय? रशिया-युक्रेन युद्धाचा तुम्हालाही फटका बसणार…

सोन्याच्या पन्नास हजारी घौडदोडीला ब्रेक; खरेदीदारांसाठी संधी, जाणून घ्या आजचे भाव

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.