Gujarat Blast | रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट, सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

स्फोटात बळी गेलेले सहा जण एका अणुभट्टीजवळ काम करत होते. सॉल्व्हेंट डिस्टिलेशन प्रक्रियेदरम्यान अचानक स्फोट झाल्याची माहिती भरुचच्या पोलीस अधीक्षक लीना पाटील यांनी दिली.

Gujarat Blast | रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट, सहा कामगारांचा होरपळून मृत्यू
धुळ्यात झोपडी जळाल्याने तीन वर्षाच्या चिमुकल्याचा होरपळून मृत्यूImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 3:46 PM

गांधीनगर : गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील एका रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट (Blast) झाला. या स्फोटात सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास हा स्फोट (Chemical Company) झाला होता. अहमदाबादपासून सुमारे 235 किमी अंतरावर असलेल्या दहेज औद्योगिक परिसरात (Bharuch Gujarat) ही घटना घडली. सॉल्व्हेंट डिस्टिलेशन प्रक्रियेदरम्यान अचानक स्फोट झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेविषयी शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली.

नेमकं काय घडलं?

गुजरातमधील भरुच जिल्ह्यात असलेल्या एका रासायनिक कारखान्यात आज भीषण स्फोट झाला. या स्फोटात सहा कामगारांना प्राण गमवावे लागले आहेत. अहमदाबादपासून अंदाजे 235 किमी अंतरावर असलेल्या दहेज औद्योगिक परिसरात ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. आज (सोमवारी) पहाटे तीन वाजताच्या सुमारास रासायनिक कारखान्यात स्फोट झाला होता.

पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरुच येथील कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानी विषयी शोक व्यक्त केला. मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान, तर जखमींना 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली.

पाहा कू अॅपवरील पोस्ट

सॉल्व्हेंट डिस्टिलेशन प्रक्रियेदरम्यान स्फोट

स्फोटात बळी गेलेले सहा जण एका अणुभट्टीजवळ काम करत होते. सॉल्व्हेंट डिस्टिलेशन प्रक्रियेदरम्यान अचानक स्फोट झाल्याची माहिती भरुचच्या पोलीस अधीक्षक लीना पाटील यांनी दिली. या घटनेत अन्य कोणीही जखमी झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

“अणुभट्टीतील स्फोटामुळे कारखान्यात आग लागली. अणुभट्टीजवळ काम करणाऱ्या सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. नंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. आगही नियंत्रणात आणण्यात आली” असंही पाटील यांनी पुढे सांगितलं.

संबंधित बातम्या :

कपडे धुवायचा त्रास वाचवणारी वॉशिंग मशिन जेव्हा जाळ ओकते, प्रत्येकाने पाहावा असा व्हिडिओ

साफसफाईचं काम सुरू असताना Moshi येथील औद्योगिक वसाहतीत स्फोट, 8 जण जखमी

यवतमाळातील आयता गावात गॅस सिलेंडरचा स्फोट, मायलेकीचा होरपळून मृत्यू!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.