मुलाला जास्त दूध का पाजतेस? नवऱ्याची इंजिनिअर बायकोला मारहाण, घराबाहेरही काढलं

फाल्गुनीने तिच्या सासरच्या मंडळींवर हुंड्याची मागणी केल्याचा आरोपही केला आहे. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की फाल्गुनीच्या सासरच्यांनी तिला 25 लाख रुपये हुंडा म्हणून आणण्यास सांगितले होते.

मुलाला जास्त दूध का पाजतेस? नवऱ्याची इंजिनिअर बायकोला मारहाण, घराबाहेरही काढलं
बाळाला दूध पाजण्यावरुन बायकोला मारहाण
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 4:02 PM

अहमदाबाद : जगातील प्रत्येक पालकाला आपले मूल निरोगी असावे अशी इच्छा असते. म्हणून, ते नेहमी आपल्या मुलाला पोषक अन्न देतात. मात्र गुजरातच्या गांधीनगरमधील (Gujarat Crime News) रहिवासी आनंद असोदिया यांना वाटले की त्यांची पत्नी फाल्गुनी असोदिया मुलाला जास्त दूध (Milk) पाजते, त्यामुळे त्यांच्या मुलाचे वजन वाढले आहे. याच कारणावरून आनंदने फाल्गुनीला मारहाण (Wife beaten up) केली. एवढेच नाही तर तिला घरातून हाकलून दिले. पीडित महिलेने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. जीआयडीसीमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून काम करणाऱ्या 37 वर्षीय फाल्गुनीने आपल्या पतीच्या कृत्याबाबत पोलिसांत तक्रार केली.

काय आहे प्रकरण?

अहमदाबाद मिररच्या वृत्तानुसार, फाल्गुनी असोदिया यांनी अहमदाबाद शहरातील कृष्णनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फाल्गुनीने तिच्या सासरच्या मंडळींवर हुंड्याची मागणी केल्याचा आरोपही केला आहे. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की फाल्गुनीच्या सासरच्यांनी तिला 25 लाख रुपये हुंडा म्हणून आणण्यास सांगितले होते.

मुलाला जास्त दूध पाजल्याचा आरोप

जेव्हा तिने मुलाला जन्म दिला तेव्हा तिचा पती आनंदने तिच्यावर आपल्या मुलाला जास्त दूध पाजल्याचा आरोप केला आणि त्यामुळे मुलाचे वजन वाढत असल्याचे सांगितले. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, अहमदाबादमध्ये वाटवा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी महेश बेचरजी ठाकोर नावाच्या व्यक्तीला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, बुधवारी एका लग्न समारंभात गरबा खेळत असताना वटवा परिसरात राहणारा अजय ठाकोर महेशच्या हाताला धडकला, त्यावरून महेशचे त्याच्याशी भांडण झाले. गरबा संपल्यावर महेशने तिला जीवे मारण्याची धमकी दिली

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.