Gujrat Milk : तब्बल 4000 लीटर भेसळयुक्त दूध जप्त! गुजरातमधून दोघांना अटक, राजकोटमध्ये मिसळलं जायचं दुधात केमिकल
गुजरात राज्यातील राजकोटमध्ये खाद्य विभागाने पोलिसांच्या मदतीने 4 हजार लीटल भेसळयुक्त दूध जप्त केलं. यासोबत दोघा जणांना अटक केली. अटक करण्यात आलेले दोघेही आरोपी एक दुधाचा ट्रक घेऊन जात होते.
देशात बहुतांश ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनाने धडक कारवाया सुरु केल्या आहेत. आता गुजरातमध्ये (Gujrat Crime News) मोठी कारवाई कऱण्यात आली असून तब्बल चार हजार लीट भेसळयुक्त दूध (Gujrat Milk News) जप्त करण्यात आलं आहे. दुधात भेसळ केल्याप्रकरणी दोघांनी अटकदेखील (Police Arrest) करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून आता अधिक तपास केला जातोय. इतरही अनेकांना या भेसळयुक्त दूधप्रकरणी अटक केली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. अटक करण्यात आलेल्या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जातेय. धक्कादायक बाबा म्हणजे गेल्या चार महिन्यांपासून भेसळयुक्त दुधाचा बाजार सुरु होता. अखेर त्याचा पर्दाफाश करण्यात खाद्य विभागाला यश आलं आहे. याआधीही अनेकदा भेसळयुक्त दूध प्रकरणी अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. मात्र त्यानंतरही दुधात भेसळ करणाऱ्यांवर कोणताही वचक बसलेला नसल्याचं या कारवाईच्या निमित्ताने पुन्हा बघायला मिळतंय. दरम्यान, आता ग्राहकांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधावरही अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. तुम्ही घरात वापरत असलेलं दूध भेसळयुक्त तर नाही ना, अशी शंकाही घेतली जातेय.
Gujarat | Four thousand liters of adulterated milk seized from a truck in Rajkot (16.08)
हे सुद्धा वाचाA truck was stopped during checking of vehicles & adulterated milk that was made from chemicals like sulfates, phosphates & carbonate oils was seized:Praveen Kumar Meena, DCP Zone-1, Rajkot pic.twitter.com/3vpJciqgNq
— ANI (@ANI) August 16, 2022
गुजरात राज्यातील राजकोटमध्ये खाद्य विभागाने पोलिसांच्या मदतीने 4 हजार लीटल भेसळयुक्त दूध जप्त केलं. यासोबत दोघा जणांना अटक केली. अटक करण्यात आलेले दोघेही आरोपी एक दुधाचा ट्रक घेऊन जात होते. त्यावेळी त्यांना रोखण्यात आलं. त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या तपासणीत दूध टँकरमधील दूधात भेसळ करण्यात आली असल्याचं पोलिसांच्या आणि खाद्य विभागाच्या तपासात निष्पन्न झालंय.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ट्रकमधून भेसळयुक्त दुधाची वाहतूक केली जाते आहे, अशी माहिती प्रवीण कुमार मीना यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून दूधाचा टँकर रोखला आणि तपासणी केली. या तपासणी दुधात भेसळ करणाऱ्यांचा भांडाफोड झालाय. आता पोलिसांनी या दूध टँकरलाही जप्त केलंय.
अटक करण्यात आलेल्या दोघा संशयित आरोपींच्या चौकशून धक्कादायक माहितीसमोर आलीय. गेल्या चार महिन्यांपासून दुधात भेसळ केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय ज्या फॅक्टरीत ही भेसळ केली जाते, तिचा पत्ताही पोलिसांना मिळालाय. या फॅक्टरीत केमिकल्स दुधाच मिसळे जात असल्याची माहिती समोर आलीय. सध्या या ठिकाणी आढळून आलेल्या दुधाचे सॅम्पल्स चाचणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले असून आता रिपोर्ट्सची प्रतीक्षा आहे. त्यानंतर अनेक गोष्टींची खुलासा होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय.