Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका वर्षाच्या चिमुरडीसमोर आईची हत्या, लिव्ह इन पार्टनरला अटक

मुलीच्या नावे प्रॉपर्टी करावी, यासाठी स्नेहलता वारंवार आपल्याला त्रास द्यायची, असा दावा प्रकाशने केला आहे. या कारणावरुन दोघांमध्ये अनेक वेळा वाद झडत असत.

एका वर्षाच्या चिमुरडीसमोर आईची हत्या, लिव्ह इन पार्टनरला अटक
जालन्यात तरुण ट्रक चालकाची दगडाने डोकं ठेचून हत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 2:37 PM

सुरत : एक वर्षाच्या चिमुरडीसमोरच तिच्या आईची हत्या (Murder) करण्यात आली. महिलेच्या लिव्ह इन पार्टनरने तिचा जीव घेतल्याचा आरोप आहे. गुजरातमधील सुरतमध्ये (Gujarat) हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी हत्या प्रकरणाचं गूढ उकलत आरोपीला अटक केली. महिला गेल्या तीन वर्षांपासून युवकासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये (Live in relation) राहत होती. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून हत्येचं कारणही स्पष्ट झालं आहे. सुरतमधील गौतमनगर सोसायटीत राहणाऱ्या स्नेहलताची तिच्या एका वर्षांच्या लेकीसमोरच हत्या करण्यात आली. दुपारच्या वेळेस पूजा करत असताना स्नेहलताचा लिव्ह इन पार्टनर प्रकाशने तिचा गळा चिरुन खून केला.

काय आहे प्रकरण?

मुलीच्या नावे प्रॉपर्टी करावी, यासाठी स्नेहलता वारंवार आपल्याला त्रास द्यायची, असा दावा प्रकाशने केला आहे. या कारणावरुन दोघांमध्ये अनेक वेळा वाद झडत असत. मंगळवारी स्नेहलता देवपूजा करत बसली होती. त्यावेळी प्रकाशने तिचा गळा चिरला आणि तिला त्याच अवस्थेत टाकून तो कामासाठी बाहेर गेला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रकाशची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरं देत होता. अखेर कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

घरी आल्यावर पार्टनरला मृतावस्थेत पाहिलं, आरोपीचा कांगावा

मी ऑफिसला गेल्यावर स्नेहलताला व्हिडीओ कॉल करायचो, मंगळवारीही मी नेहमीप्रमाणे व्हिडीओ कॉल केला, मात्र कुठलाच प्रतिसाद आला नाही, असं सुरुवातीला प्रकाशने पोलिसांना सांगितलं. संध्याकाळी मी घरी आलो, तेव्हा स्नेहलता मृतावस्थेत पडली होती, तर घरभर रक्ताचा सडा पडला होता, असा कांगावा सुरुवातीला प्रकाशने केल्याची माहिती डीसीपी सज्जन सिंह परमार यांनी दिली. पोलिसांसमोर त्याने चिमुरडीला कडेवर घेत रडण्याचं नाटकही केलं, मात्र पोलिसांनी कसून चौकशी करताच त्याचा आविर्भाव मोडला. संबंधित बातम्या :

बायकोच्या हत्या प्रकरणात नवऱ्याला तुरुंगवास, नऊ वर्षांनी विवाहिता जिवंत समोर

35 वर्षीय महिलेचा शेतात मृतदेह सापडला, डोक्यात दगड घालून हत्येचा संशय

जागेच्या वादातून रक्तरंजित थरार, चौघांची निर्घृण हत्या, सहा जण गंभीर

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.