रात्री आईला औषध देऊन झोपवले, मध्यरात्री आईला जाग आली अन् ती रात्र तिची शेवटची ठरली !

घरचे सर्वजण बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरी आई आणि मुलं एकटे होते. रात्री जेवून नेहमीप्रमाणे सर्वजण झोपी गेले. मात्र रात्री जे घडले ते पाहून सर्वच हादरले.

रात्री आईला औषध देऊन झोपवले, मध्यरात्री आईला जाग आली अन् ती रात्र तिची शेवटची ठरली !
प्रियकरासोबत पाहिले म्हणून मुलीने आईला संपवलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 9:39 AM

जुनागढ : गुजरातमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. प्रियकरासोबत रंगेहाथ पकडणाऱ्या आईची 19 वर्षाच्या मुलीने हत्या केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील जुनागढ येथे घडली. पोलिसांनी मुलीला अटक केली आहे. मुलीने पोलीस चौकशीत हत्येची कबुली दिली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घरातील अन्य लोक बाहेर गेले होते. घरी मुलगी, तिची आई आणि लहान मुलंच होती. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, बाहेरील व्यक्ती आत आल्याच्या कोणत्याच खुणा दिसत नव्हत्या. घरातील वस्तूही चोरीला गेल्या नव्हत्या. यामुळे मुलीची कसून चौकशी केली असता प्रकरणाचा उलगडा झाला.

आईने प्रियकरासोबत पाहिले म्हणून हत्या

घरातील सर्वजण बाहेर गेल्याची संधी साधत मुलीने आईला झोपेची गोळी देऊन रात्री झोपवले. यामुळे आई गाढ झोपली असे वाटल्याने मुलीने प्रियकराला घरी बोलावले. घरातील सर्व सीसीटीव्ही बंद करुन ठेवले होते. मात्र मध्यरात्री आईला जाग आली आणि आईने मुलीला प्रियकरासोबत पाहिले. यानंतर आई सकाळी घरच्यांना सांगेल आणि आपल्याला ओरडा पडेल म्हणून मुलीने आईची हत्या केली.

पोलीस चौकशीत मुलीने दिली हत्येची चौकशी

दुसऱ्या दिवशी सकाळी महिलेच्या हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस चौकशीत घरी महिला आणि मुलंच असल्याचे कळले. घरातील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद होते. घरात जबरदस्ती कुणी घुसल्याच्या खुणाही नव्हत्या. यानंतर पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता धक्कादायक बाब उघडकीस आली. मुलीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.

हे सुद्धा वाचा

मुलीचा पराक्रम ऐकल्यानंतर घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी मुलीला अटक केली असून, पुढील कारवाई सुरु आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.