AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime news | नीलूने माझा साखरपुडा होणार एवढ सांगितल्यावर भर रस्त्यात जे घडलं ते भयानक

Crime news | माणसामध्ये इतकी क्रूरता कुठून येते?. अर्चनादेवी धावत घराच्या बाहेर आली, त्यावेळी समोरच दुश्य पाहून तिच्या पायाखालची जमनीच सरकली. 10 लोक तिथे जमले होते.

Crime news | नीलूने माझा साखरपुडा होणार एवढ सांगितल्यावर भर रस्त्यात जे घडलं ते भयानक
Shailesh Vishwakarma-Nilu Vishwakarma
| Updated on: Sep 15, 2023 | 10:33 AM
Share

सूरत : आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो, त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात क्रौर्याची भावना कशी येऊ शकते? एखाद्याला इतक्या निष्ठूरपणे संपवण्याची क्रूरता माणसामध्ये कुठून येते? प्रेम म्हणजे विश्वास, दुसऱ्याच्या आनंदासाठी केलेला त्याग. पण फार कमी जणांना ही गोष्ट कळते. गुजरातच्या सूरतमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. शैलेश विश्वकर्मा या 24 वर्षाच्या तरुणाने रागाच्या भरात जे केलं, त्याने सगळेच हादरले. जिच्यावर जीव लावला, तिचाच जीव घेतला. शैलेशने भर रस्त्यात नीलूवर स्क्रूड्रायव्हरने हल्ला केला. सूरतच्या सचिन जीआयडीसी भागात ही घटना घडली. यावेळी रस्त्यावरील लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. शैलेश आणि नीलू तालंगपूर गावातील साई दर्शन सोसायटीत रहायचे. तीन वर्षापासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. नीलूने काही दिवसांपूर्वी तिचा साखरपुडा दुसऱ्या व्यक्तीसोबत होऊ शकतो, याची शैलेशला कल्पना दिली होती. तोच राग शैलशच्या मनात धुमसत होता. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास नीलू शेजारी राहणाऱ्या कमलादेवी यांच्या घरी गेली होती. नीलूची वहिनी अर्चनादेवी घरात काम करत होती. अचानक अर्चनादेवीने नीलू आणि कमलादेवीच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. अर्चनादेवी धावत घराच्या बाहेर आली, त्यावेळी समोरच दुश्य पाहून तिच्या पायाखालची जमनीच सरकली. शैलेश स्क्रूड्रायव्हरने नीलूवर वार करत होता. त्यावेळी 10 लोक तिथे जमले होते. पण कोणी मध्ये पडण्याची हिम्मत दाखवली नाही. नीलू आई-वडिल, बहिण, दोन भाऊ आणि वहिनीसोबत रहायची. घडना घडली त्यावेळी नीलूची बहिण ट्युशनला गेली होती. अन्य सदस्य मिलमध्ये कामावर गेले होते. शैलशने नीलूवर वार केले. त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घातला. जागीच नीलूचा मृत्यू झाला. शैलेश तिथून पळून गेला नाही. तो तिथेच नीलूच्या मृतदेहाच्या बाजूला बसून राहिला.

शैलेश मृतदेहाच्या बाजूला बसून होता

नीलूवर हल्ला होत असताना, परिसरातील कोणीतरी पोलिसांना याद्दल कळवलं. पोलीस तिथे आले त्यावेळी शैलेश मृतदेहाच्या बाजूला बसून होता. पोलिसांनी त्याला तिथूनच अटक केली. शैलेशचे कुटुंबीय मजुरीचे काम करतात. दोन्ही कुटुंब उत्तर प्रदेश अयोध्येचे रहिवाशी आहेत. मागच्या 12 वर्षापासून दोन्ही कुटुंब सूरतमध्ये स्थायिक आहेत.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.