Gujrat Drugs Seized : गुजरातमध्ये पुन्हा मोठी कारवाई! पाकिस्तानी बोटीतून आणलेलं तब्बल 250 कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त

Gujrat Heroin News : काही दिवसांपूर्वी मिठाण्या गोण्यांमधून ड्रग्जची वाहतूक करण्यात आल्यांचं समोर आलं होतं.

Gujrat Drugs Seized : गुजरातमध्ये पुन्हा मोठी कारवाई! पाकिस्तानी बोटीतून आणलेलं तब्बल 250 कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त
कारवाईचा प्रातिनिधिक फोटोImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 7:23 AM

मुंबई : गुजरातमध्ये एटीएसकडून (Gujrat ATS) केल्या जाणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईला वेग आला आहे. आता पुन्हा एकदा गुजरातमध्ये मोठी कारवाई एटीएस आणि बीएसएफने केली आहे. यावेळी तर चक्क पाकिस्तानमधील (Pakistan News) बोटमधून आणण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अंमली साठ्यावर कारवाई केली गेली. मुंद्रा बंदरातून 500 किलोचं कोट्यवधी रुपयांचं कोकेन जप्त केल्याची घटना ताजी असतानाच आता जखाऊन बंदराजवळ मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी तब्बल 250 कोटी रुपये किंमतीचे 50 किलो हेरॉईन जप्त (Gujrat heroin Seized) करण्यात आलंय. पाकिस्तानी बोटीतून हा साठा भारतात आणला जात होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर एटीएसने बीएसएफच्या मदतीने संयुक्त कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये सातत्याने ड्रग्ज तस्करीचा गोरखधंदाच सुरु आहे की काय? अशी शंका घेतली जाते आहे. वेळोवेळी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्याच्या कारवाया समोर येत असल्याच याबाबतचा संशय बळावतोय.

सोमवारी मोठी कारवाई

गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईबाबत माहिती दिली. एटीएसचे उपअदीक्षक भावेश रोजि यांनी कच्छमध्ये असलेल्या जखाऊ बंदराजवळील समुद्रामध्ये ही कारवाई करण्यात आल्यां स्पष्ट केलंय. संबंधित अधिकाऱ्यांना अंमली साठा आणला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई केली गेली.

ड्रग्ज समुद्रात फेकले

एटीएस आणि बीएसएफच्या पथकानं अरबी समुद्रात संशयास्पद बोटींचा पाठलाग केला. त्यानंर ही बोटही ताब्यात घेण्यात आली. दरम्यान, या बोटीत ड्रग्ज सापडले नव्हता. कारण बोटीतील ड्रग्जच्या पिशव्या समुद्राक फेकल्या गेल्या होत्या. यासाठी पुन्हा वेगळी शोधमोहीम राबवली गेली. या शोधमोहिमेदरम्यान पथकाला तब्बल 49 पिशव्या सापडल्या. या पिशव्यांमध्ये 50 किलो इतकं हेरॉईन सापडलंय.

हे सुद्धा वाचा

कारवाईदरम्यान सापडलेल्या 50 कोटी हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 250 कोटी रुपये असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, आठवड्याभरापूर्वीच मिठाण्या गोण्यांमधून ड्रग्जची वाहतूक करण्यात आल्यांचं समोर आलं होतं. याप्रकरणी मुंद्रा बंदरामध्ये कारवाई करण्यात आलेली. इराणमधून मिठाच्या गोण्या असल्याचं सांगून ड्रग्ज बंदरावर उतरवण्यात आलं होतं.

मात्र तपासाअंती हे मिठ नसून अंमली पदार्थांचा साठा असल्याचं समोर आलं. ही कारवाई ताजी असतानाच आता पुन्हा एकदा गुजरामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली साठा जप्त करण्यात आलाय. कारवाई होत असूनही सातत्यानं अंमली पदार्थांची वाहतूक गुजरातमध्ये कुणाच्या आशीर्वादानं सुरु आहे, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....