ही बाई आहे की हैवान ! लिफ्टमध्ये कुत्र्यासोबत असं काही केलं की कुत्रा जखमीच झाला; व्हिडीओ तुफ्फान व्हायरल
Viral Video : मुक्या प्राण्यांना बोलता येत नसलं तरी त्यांना प्रेमाची भाषा कळते आणि ते तसेच व्यक्तही होतात. पण व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत एक महिला कुत्र्यासोबत जे वागली आहे ते पाहून तुमचाही संताप होईल.
नवी दिल्ली : प्राण्यांना बोलता येत नाही, पण ते प्रेम व्यक्त करू शकतात. पण मुक्या प्राण्यासंदर्भात एक क्रौर्याचा (cruelty) प्रकार समोर आला आहे, जो पाहून प्रत्येक व्यक्ती हादरेल. ही घटना राजधानीला लागून असलेल्या सायबर सिटी गुरुग्राम (gurugram) येथील आहे. येथील एका सोसायटीमधील व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये घरकाम करणाऱ्या एका महिलेने लिफ्टमध्ये (lift) कुत्र्यासोबत अतिशय क्रूर वर्तन केले आहे. लिफ्टमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (cctv camera) तिचे हे कृत्य कैद झाले आहे.
काय आहे प्रकरण ?
खरंतर गुरुग्रामच मधील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या पिता-पुत्राच्या घरात दोन विदेशी जातीचे कुत्रे आहेत. त्यांची देखभाल घरकाम करणारी महिलाच करते. बुधवारी ती महिला त्या दोन्ही पाळीव कुत्र्यांना वॉकसाठी घेऊन गेली होती. परत येताना लिफ्टमध्ये शिरल्यावर तिने पग जातीच्या कुत्र्याला उचललं आणि लिफ्टच्या फरशीवर जोरात आपटलं. हे क्रूर कृत्य तिने एक-दोन वेळा नव्हे तर तब्बल तीन वेळा केलं. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कॅप्चर झाली असून हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे.
Shocking video came from Gurgaon, Haryana. Woman slaps dog in lift, FIR registered. #Haryana #Gurugram #ViralVideos pic.twitter.com/G6GbwkCXkI
— Jacob Mathew (@Jacobmathewlive) April 13, 2023
घरमालकांनी महिलेविरोधात कोणतीही कारवाई केली नाही
सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे ही घटना घडल्यानंतर, त्या घरकाम करणाऱ्या महिलेविरोधात मालकाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. हा व्हायरल व्हिडिओ जेव्हा पीपल फॉर ॲनिमल्स या संस्थेकडे पोहोचला तेव्हा संस्थेच्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला व त्यांनी गुरुग्रामच्या बजघेडा पोलिस ठाण्यात तक्रार करून कुत्र्याची सुटका केली. यासोबतच पोलिसांनी मेडवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
लिफ्टमधील सीसीटीव्हीमध्ये घटना झाली कैद
या सोसाटीच्या लिफ्टमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोसायटी आणि परिसरात व्हायरल झाला. जेव्हा हा व्हायरल व्हिडिओ आरडब्ल्यूएच्या एका गटापर्यंत पोहोचला तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या एका पीएफए स्वयंसेवकाने (people for animals) व्हिडिओ पाठवणाऱ्याशी संपर्क साधला. या प्रकरणी जेव्हा सोसायटीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला तेव्हा त्यांनी बदनामीच्या भीतीने कोणतीही माहिती देण्यासच नकार दिला.
पोलिसांत दाखल केली तक्रार
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीपल फॉर ॲनिमल्स (पीएफए) च्या सदस्यांनी बाजखेडा पोलिस स्टेशन गाठून त्या महिलेविरोधात विरोधात तक्रार दाखल केल आणि त्या पाळीव प्राण्यांची सुटका करून मेडवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यावर पोलिसांनी पीएफए पथकासह सोसायटीत पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला.