लिंकवर क्लिक करा नाहीतर फोन होईल हॅक; फसवणूक करून कोट्यवधी रुपये लुटणाऱ्यांना अटक
गुडगाव पोलिसांनी चटर्जी सायबरच्या सदस्यांना अटक केली आहे. चॅटर्जी सायबरचे सदस्य लोकांना फोन करून खोट्या नोकरीचे आमिष दाखवून आणि विविध प्रकारचे सायबर गुन्हे करून पैसे उकळायचे. या लोकांनी आतापर्यंत 22 कोटींची फसवणूक केली आहे. मात्र, पोलिसांनी आरोपीला अटक करून चौकशी केली आहे.
गुरूग्राम | 18 नोव्हेंबर 2023 : सध्या सायबर क्राईमचे प्रमाण वाढलं आहे. सामान्य, निष्पाप लोकांना फसवून , ऑनलाइन माध्यमातून त्यांची फसवणूक करून पैसे उकळणाऱ्या अनेक बदमाशांचे गुन्हे वाढले आहेत. अशाच एका चॅटर्जी सायबर घोटाळ्यात गुडगाव पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. हे सायबर ठग लोकांना खोट्या नोकरीचे आमिष दाखवून त्यांचे फोन हॅक करायचे. त्यानंतर ते त्यांच्या खात्यातून पैसे काढायचे. एवढेच नाही तर युट्युबवर बनावट लाईक्स आणि सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून ते लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळायचे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या गुंडांनी लोकांकडून 22 कोटी रुपये उकळले आहेत.
रिपोर्ट्सनुसार, ऑक्टोबरमध्ये गुडगावमध्ये राहणाऱ्या एका महिलेला अनोळखी नंबरवरून कॉल आल्याने हा प्रकार उघडकीस आला. आरोपीने पीडित महिलेच्या फोनवर लिंक पाठवली आणि तिला त्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले. त्या लिंकवर क्लिक केले नाही तर तुमचा फोन हॅक होईल असे सांगत त्या बदमाशाने महिलेला आधीच घाबरवले होते. लिंकवर क्लिक करून फोन सेव्ह करण्याची ऑफर त्या महिलेला देण्यात आली. भीतीपोटी महिलेने व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक केले.
मात्र त्या महिलेने लिंकवर क्लिक करताच तिचा फोन बंद झाला. तो फोन झाल्यावर महिलेच्या अकाऊंटमधून 80 हजार रुपये काढण्यात आल्याचा एक एसएमएस तिला आला. एका क्षणाता तिने हजारो रुपये गमावले. यानंतर त्या बदमाशांची हिंमत वाढली आणि गुन्हेगारीच्या या घटना आणखीनच वाढल्या. लोकांना बोलण्यात फसवून त्यांनी आणखी पैसे उकळण्यास सुरूवात केली.
अशी प्रकरणे वाढू लागल्यावर पोलिसांत अनेक तक्रारी दाखल झाल्या आणि पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी जाळे पसरवले. त्यानंतर गुडगाव पोलिसांनी 7 सायबर ठगांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता, या लोकांनी खोटे गुन्हे करून सुमारे 22 कोटी रुपये उकळल्याचे उघड झाले.
दानिश, माजिद, नवदीप कुमावत, कृष्ण गोपाल, महेंद्र कुमार सेन आणि सचिन नामा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असल्याचे पोलिस उपायुक्त सिद्धांत जैन यांनी सांगितले. या लोकांवर देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. तसेच, हे लोक लोकांना बनावट नोकरीचे आमिष दाखवून यूट्यूबवर लाइक्स वाढवायचे आणि बोलण्यात फसलेल्या लोकांकडून असेही पोलिसांनी सांगितले.