VIDEO | पोलीसांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद, तरुणाला रस्त्यात खेचून-खेचून मारहाण
Crime News : एका तरुणाला पोलिसांनी रस्त्यात खेचून-खेचून मारहाण केली आहे. त्या मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. या प्रकरणात ज्या पोलिसांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
नवी दिल्ली : सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Video Viral on Social Media) चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका तरुणाचा काही पोलिसांनी (police) रस्त्यात बेदम मारहाण केली असल्याचं स्पष्ट दिसत आहे. मारहाण करीत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकांनी आणि नातेवाईकांनी त्या पोलिस कर्मचाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत सुद्धा पोहोचला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणात पोलिसांवरती कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या तरुणाने तक्रार दाखल केली आहे, त्याचं नाव मंजीत असं आहे. हा तरुण हरियाणा (hariyana crime news in marathi) राज्यातील जींद जिल्ह्यातील नरवाना कस्बे येथील कर्मगढ गावातील रहिवासी आहे.
तीन पोलिस कर्मचाऱ्यांची तरुणाला बेदम मारहाण
असं सांगितलं जात आहे की, तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला बेदम मारहाण केली आहे. ते सगळे कर्मचारी 112 या डायल वाहनावरती तैनात होते. सध्याच्या व्हायरल व्हिडीओमध्ये तीन पोलिस कर्मचारी त्या तरुणाला बेदम मारहाण करीत आहेत. त्याचबरोबर त्या तरुणाला जबरदस्तीने त्या वाहनात बसवण्याचा प्रयत्न करीत आहेत, पोलिसांनी शिवीगाळ केल्याचा आवाज येत आहे.
पोलिस कर्मचाऱ्यांच्यासमोर रडला तरुण
त्या व्हिडीओमध्ये एक तरुण हात जोडून पोलिसांना विनंती करीत आहे. परंतु पोलिस त्या तरुणाचं अजिबात ऐकायला तयार नाहीत. त्याचवेळी तिथं आणखी काही रहिवासी दिसत आहेत. पण पोलिसांचा मार पाहून या प्रकरणात कुणी हस्तक्षेप केला नाही. हरियाणा सरकारकडून लोकांच्या अतिजलद सेवेसाठी डायल-112 ही प्रणाली सुरु केली आहे. त्या वाहनद्वारे लोकांची तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला जातो.
पीडित तरुणाने आरोपींच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. डीएसपी संदीप सिंह यांच्यासमोर हे प्रकरण आलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Dial 112 की टीम का कारनामा! हरियाणा के जींद में बीच सड़क पर एक नौजवान को 3 पुलिस वालो द्वारा बेहरहमी से पीटने का वीडियो आया सामने विडियो में पुलिस युवक को मारते हुए डायल 112 के व्हीकल में जबरदस्ती डालने की कोशिश करते भी दिखाई दे रहे हैं।
वीडियो में साफ दिखाई दे रहा है की 3… pic.twitter.com/pumm5wRoBN
— Vijender Kumar (@vijenderhisar) September 10, 2023
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, पीडित मंजीत हा तरुण त्या गाडीतून म्हैस घेऊन दुसरीकडे निघाला होता. त्यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याची गाडी अडवली. त्याने आरोप केला आहे की, तीन पोलिस कर्मचारी दारुच्या नशेत होते. त्याचबरोबर त्यांनी २ हजार रुपयांची मागणी केली होती. ज्यावेळी त्याने पोलिसांनी पैसे देण्यास नकार दिला, त्यावेळी पोलिसांनी शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली.