AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Himani Murder Case : जवळच्या माणसाने हिमानीला संपवलं, काँग्रेस महिला नेत्याच्या हत्या प्रकरणात पहिली अटक

Himani Murder Case : काँग्रेस कार्यकर्ता हिमानी नरवाल हत्या प्रकरणात पहिली अटक झाली आहे. हिमानी नरवालची हत्या झाल्याच समजल्यानंतर एकच खळबळ उडाली. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत दिसल्याने हिमानी चर्चेत आलेली.

Himani Murder Case : जवळच्या माणसाने हिमानीला संपवलं, काँग्रेस महिला नेत्याच्या हत्या प्रकरणात पहिली अटक
Himani Narwal
| Updated on: Mar 03, 2025 | 9:48 AM
Share

काँग्रेस कार्यकर्ता हिमानी नरवाल हत्या प्रकरणात पोलिसांना 36 तासानंतर पहिलं यश मिळालं आहे. पोलिसांनी हत्याकांडाच्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरु आहे. आरोपी मृत हिमानी नरवालचा मित्र आहे. हिमानीची हत्या त्याच्या घरात करण्यात आली होती. त्यानंतर त्याने हिमानीचा मृतदेह सूटकेसमध्ये भरला. सांपला बस स्टँडवर ती बंद सूटकेस सोडून आरोपी फरार झाला. आरोपी दिल्लीला निघून गेला होता. हरियाणा पोलिसांनी याची माहिती दिली आहे. हिमानी नरवाल हरियाणा रोहतकमधील काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता होती.

आरोपीने आपलं नाव सचिन सांगितलं असून तो रोहतकच राहणारा आहे. त्याने हिमानीची हत्या का केली? या बद्दल त्याची कसून चौकशी सुरु आहे. हरियाणा पोलिसांनी आरोपी सचिनला दिल्लीतून अटक केली. अटक केलेल्या आरोपीकडे हिमानीचा फोन आणि दागिने सापडले आहेत. आज सोमवारी हरियाणा पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करु शकतात.

घरापासून 800 मीटर अंतरावर फेकला मृतदेह

हरियाणाा पोलिसांनी माहिती देताना या प्रकरणात पहिली अटक झाल्याच सांगितलं आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार आरोपी सचिन रोहतकचा राहणारा आहे. सचिनने त्याच्या विजयनगर येथील रुममध्ये हिमानीची हत्या केली. आरोपीने आधी हिमानीची मर्डर केली. त्यानंतर तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरला. घरापासून 800 मीटर अंतरावर सांपला बस स्टँडवर त्याने ही सूटकेस फेकून दिली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवून दिला होता.

मृतदेहाचा चेहरा निळा पडलेला

काँग्रेस कार्यकर्ता हिमानी नरवालचा मृतदेह 1 मार्च रोजी रोहतक हायवे वर सांपला बस स्टँडवर मिळाला. मृतदेह एका सूटकेसमध्ये होता. पोलीस तपासात मृतदेहाचा चेहरा निळा पडल्याच दिसून आलं. तिच्या हातावर मेहंदी होती. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. चौकशी केली. तपासात आरोपीच नाव सचिन असल्याच समजलं. पोलिसांनी त्याला दिल्लीतून अटक केली.

लग्नासाठी मुलाचा शोध सुरु होता

हिमानी नरवालची हत्या झाल्याच समजल्यानंतर एकच खळबळ उडाली. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत दिसल्याने हिमानी चर्चेत आलेली. हिमानीच्या वडिलांनी आत्महत्या करुन जीवन संपवलेलं. दुश्मनीमुळे भावाची हत्या करण्यात आलेली. हिमानी आपली आई आणि भावासोबत रोहतकच्या विजयनगर भागात राहत होती. नातेवाईकांनुसार हिमानीच लग्न याच वर्षी होणार होतं. तिच्यासाठी मुलाचा शोध सुरु होता. 2024 मध्ये निवडणुकीत व्यस्त असल्याने ती 2025 मध्ये लग्न करणार होती.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.